![]() |
पोर्तुगीज दूतावास सांस्कृतिक केंद्राचे प्रतिनिधी डॉ. डेल्फीम कोरेइया दा सिल्वा यांचे ग्रंथभेट देऊन शिवाजी विद्यापीठात स्वागत करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के |
कोल्हापूर, दि.
२० फेब्रुवारी: गोवा येथील पोर्तुगीज दूतावास सांस्कृतिक केंद्राचे प्रतिनिधी डॉ.
डेल्फीम कोरेइया दा सिल्वा यांनी नुकतीच शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट दिली.
यावेळी पोर्तुगीज आणि मराठी भाषा यांमधील सांस्कृतिक बंध दृढ करण्यासाठी सहकार्यवृद्धी
करण्याच्या अनुषंगाने त्यांनी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याशी चर्चा केली.
शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा
विभागाने ‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर को-ऑपरेशन
अँड लँग्वेज’, लिस्बन (पोर्तुगाल)
या संस्थेसमवेत सन २०२३ मध्ये सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत पोर्तुगीज
भाषा आणि संस्कृती प्रसार, शिक्षक प्रशिक्षण, तसेच
वैज्ञानिक आणि सांस्कृतिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये सहकार्य इत्यादी बाबींचा
समावेश आहे. पोर्तुगीज भाषा अभ्यासक्रम सुरु करणारे शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रातील
पहिले व एकमेव विद्यापीठ आहे. शिवाजी विद्यापीठात पोर्तुगीज भाषेचा एक वर्षाचा
प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु आहे.
यावेळी डॉ. सिल्वा यांनी कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांच्याशी सामंजस्य कराराच्या प्रगतीविषयी सविस्तर चर्चा केली.
तसेच, करारात ठरल्यानुसार २,५०,७४९/-
रुपयांचा धनादेशही शिवाजी विद्यापीठासाठी त्यांनी कुलगुरूंकडे सुपूर्द केला.
दोन्ही शैक्षणिक संस्थांदरम्यान विद्यार्थी-शिक्षक एक्स्चेंज उपक्रम तसेच संशोधकांसाठी
२० दिवसांचा पोर्तुगालचा अभ्यासदौरा आणि पोर्तुगाल भाषेच्या
अभ्यासक्रमाचा विस्तार या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी विदेशी भाषा
विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे, ऐश्वर्या चव्हाण उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment