![]() |
पुस्तकाचे मुखपृष्ठ |
कोल्हापूर, दि. १९ फेब्रुवारी: डॉ. सुमित्रा कुलकर्णी
लिखित व डॉ. अवनीश पाटील संपादित ‘मराठा स्वराज्य निर्मिती: एक अवलोकन’ या पुस्तकाचे आज शिवजयंतीचे
औचित्य साधून शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ
पुतळ्याच्या चरणी प्रकाशन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या
इतिहास अधिविभागातर्फे ३५०व्या शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने गतवर्षी २६
फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेअंतर्गत ‘मराठा स्वराज्य निर्मिती: एक अवलोकन’ या विषयावर ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ तथा सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठाच्या माजी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. सुमित्रा कुलकर्णी यांचे
विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचे संपादित पुस्तक रुपाने
प्रकाशन करावे, अशी सूचना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केली होती. त्यानुसार इतिहास
अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाचे आज
शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या
पायाशी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
यांच्यासह मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग
आणि छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व
मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी
पाटील, अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. तानाजी चौगुले, डॉ.
शरद बनसोडे, डॉ. धनंजय सुतार, डॉ. सागर डेळेकर, डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह डॉ.
अवनीश पाटील, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. दत्तात्रय मचाले आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment