कोल्हापूर, दि. २२
सप्टेंबर: थोर समाजसुधारक व शिक्षण
प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात
साजरी करण्यात आली.
आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते कर्मवीर पाटील यांच्या
प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिर्के
यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील कर्मवीर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही
पुष्प वाहून अभिवादन केले. या प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह
उपकुलसचिव डॉ. विलास शिंदे, विलास सोयम, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. संभाजी शिंदे,
डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. मीना पोतदार, डॉ. एम.टी. गोफणे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment