Tuesday 7 September 2021

शिवाजी विद्यापीठात राजे उमाजी नाईक यांची जयंती

 



कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर: आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, जैवतंत्रज्ञान अधिविभागाच्या डॉ. ज्योती जाधव, उपकुलसचिव विलास सोयम यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment