शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित हिंदी दिवस कार्यक्रमात बोलताना लेखक भगवानदास मोरवाल |
कोल्हापूर, दि. १७ सप्टेंबर: शिवाजी विदयापीठाच्या हिंदी अधिविभागात १४ सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय हिंदी दिवस’
उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रसिद्ध हिंदी लेखक भगवानदास मोरवाल
यांचे विसेष ऑनलाईन व्याख्यान झाले.
अधिविभागात २३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात
आलेल्या ऑनलाईन पीएच.डी कोर्सवर्कचा समारोप समारंभही यावेळी करण्यात आला. अध्यक्षस्थानी
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के होते.
श्री. मोरवाल यांनी, संशोधनकार्य करताना समाजाभिमुख व सृजनात्मक दृष्टिकोनातून
लेखन करावे, असा संदेश दिला. मोरवाल यांच्या काला पहाड, वंचना, शंकुतिका
या कादंबऱ्या तसेच काही कथासंग्रह हिंदी विभागाच्या एम.ए. भाग-१च्या अभ्यासक्रमामध्ये
आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील उपस्थित
होते. हिंदी विभागप्रमुख डॉ. ए.एम. सरवदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.चंदा सोनकर यांनी
स्वागत व परिचय करुन दिला. विजय सदामते यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment