कोल्हापूर, दि. २ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या
प्रमुख प्रा. डॉ.
निशा पवार लिखित ‘मीडिया रिसर्च इन कंटेम्पररी सोसायटी’ या संशोधन ग्रंथाचे
प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते आज करण्यात
आले. या वेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर, तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ. आर. के. कामत तसेच विद्यापीठाच्या तंत्राज्ञान विभागाचे शिक्षक
उपस्थित होते.
‘मीडिया रिसर्च इन कंटेम्पररी सोसायटी’ हा ग्रंथ डॉ. निशा पवार यांच्या निवडक माध्यमविषयक संशोधन लेखांचा संग्रह आहे. यात समकालीन माध्यम संशोधनाचा समावेश असून विशेष म्हणजे कर्नाटक विद्यापीठ, धारवाड यांच्यातर्फे हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. माध्यमातील विविध विषयांचा ऊहापोह या लेखांमध्ये असून त्याचा लाभ माध्यमातील संशोधक विद्यार्थी आणि शिक्षक यांना होईल, असा विश्वास डॉ. निशा पवार यांनी व्यक्त केला. डॉ. निशा पवार यांनी आतापर्यंत दहापेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन केले असून यात पब्लिक रिलेशन, थिअरॉटिकल डायमेन्शन ऑफ वुमन इन इंडियन प्रिंट मीडिया, वृत्तपत्रीय लेखनाची दोन दशके, संवादशास्त्र, वूमन इन रिजनल टेलीविजन चॅनल्स इत्यादी मराठी आणि इंग्रजी ग्रंथांचा समावेश आहे. याप्रसंगी डॉ. निशा पवार यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली.
No comments:
Post a Comment