सोनाली नवांगुळ यांना शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ग्रंथभेट देताना प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत (डावीकडून) उदय कुलकर्णी, डॉ. नंदकुमार मोरे, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि डॉ. रणधीर शिंदे. |
कोल्हापूर, दि. २०
सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी येथील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका
सोनाली नवांगुळ यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन आज विद्यापीठाच्या वतीने अभिनंदन
केले.
सोनाली नवांगुळ यांनी अनुवादित केलेल्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला
आहे. त्या निमित्ताने त्यांचा गौरव करण्यात आला.
सोनाली नवांगुळ यांचे साहित्यिक तसेच सामाजिक कार्य आदर्शवत स्वरुपाचे
असल्याचे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या प्रसंगी काढले. शिवाजी
विद्यापीठातर्फे त्यांनी पुष्प व ग्रंथभेट देऊन नवांगुळ यांचे अभिनंदन केले. या
प्रसंगी त्यांच्यासमवेत प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ.
रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी होते.
No comments:
Post a Comment