Dr. Chandrakant Langare |
प्रा. बेट्झल आणि प्रा. लंगरे यांनी ‘रिफ्लेक्शन्स ऑन महात्मा गांधी: द ग्लोबल परस्पेक्टीव्ह’ आणि ‘रिथिंकिंग महात्मा गांधी: द ग्लोबल अप्रायझल’ हे दोन संदर्भग्रंथ संपादित केले आहेत. महात्मा
गांधी यांची १५० वी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन यांचे औचित्य साधून जेम्स
मॅडिसन विद्यापीठाचे महात्मा गांधी सेंटर आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त
विद्यमाने हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी प्रा. पारेख आणि श्री. गांधी यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, जेम्स मॅडिसन विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. हीथर
कोल्टमन, मॅडिसन विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड लेटर्सचे अधिष्ठाता डॉ.
रॉबर्ट ऑग्युरे, महात्मा गांधी सेंटरच्या संचालक डॉ. टैमी कासल उपस्थित राहणार
आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://linktr.ee/gandhicenterjmu या लिंकवर पूर्वनोंदणी
करणे आवश्यक आहे, असे डॉ. कासल यांनी कळविले आहे.
जगातील ६१ गांधी अभ्यासकांचे लेखन
दिवंगत प्रा. टेरी बेट्झल आणि प्रा. चंद्रकांत लंगरे यांनी ‘इंडो-अमेरिकन बुक प्रोजेक्ट २०१९’अंतर्गत महात्मा गांधी
यांच्याविषयीच्या ग्रंथांचा प्रकल्प हाती घेतला. त्यातून ‘रिफ्लेक्शन्स ऑन महात्मा गांधी: द ग्लोबल परस्पेक्टीव्ह’ आणि ‘रिथिंकिंग महात्मा गांधी: द ग्लोबल अप्रायझल’ हे दोन संदर्भग्रंथ साकार झाले आहेत. दोन्ही ग्रंथांत मिळून जगभरातील
एकूण ६१ गांधी अभ्यासक-संशोधकांनी महात्मा गांधींच्या विविध पैलूंवर संशोधनपर लेख
लिहीले आहेत. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, इटली, जर्मनी, जपान आणि भारतातील गांधी विचारवंत व संशोधकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ग्रंथांसाठी जागतिक ख्यातीचे गांधी तत्त्वज्ञ
आणि राजकीय विचारवंत, भाषाशास्त्रज्ञ, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये प्रदीर्घ
काळापासून मजूर पक्षाचे सदस्य, लंडन स्कूल ऑप इकॉनॉमिक्स, वेस्टमिन्स्टर
विद्यापीठाचे प्राध्यापक आणि ब्रिटीश अॅकॅडमीचे सदस्य लॉर्ड भिकू पारेख यांची प्रस्तावना
लाभली आहे. तर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, लेखक तुषार गांधी यांचा अभिप्राय
लाभला आहे.
No comments:
Post a Comment