कोल्हापूर, दि. १५
फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आज
संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील
यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन
करण्यात आले. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी विकास
विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे,
डॉ. प्रल्हाद माने, प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment