 |
| शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. |
 |
| शिवाजी विद्यापीठात ध्वजवंदनानंतर सर्व उपस्थितांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह अन्य अधिकारी. |
 |
| शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी १२५ फुटी तिरंग्यासह विद्यापीठ प्रांगणात प्रभातफेरी काढली. |
 |
| शिवाजी विद्यापीठात १२५ फुटी तिरंग्यासह प्रभातफेरीत सहभागी झालेले कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह सर्व अधिकारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. |
 |
| शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि अन्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रभात फेरी काढण्यात आली. |
 |
| शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि अन्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रभात फेरी काढण्यात आली. |
कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव,
शिवाजी विद्यापीठाचा हीरकमहोत्सव या संयुक्त पार्श्वभूमीवर आज साजऱ्या झालेल्या
स्वातंत्र्यदिनाचा उत्साह शिवाजी विद्यापीठात आज ओसंडून वाहिला. विद्यापीठाच्या
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी १२५ फुटी तिरंगी ध्वजासह काढलेली फेरी हे
या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहिले. ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेप्रमाणेच ‘हर हाथ तिरंगा’ घेऊन
प्रत्येक घटकाने हा स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित केला.
आज सकाळी ठीक आठ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते
विद्यापीठाच्या प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन
करण्यात आले. त्यानंतर प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास
मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के आणि
मान्यवरांच्या नेतृत्वाखाली १२५ फुटी तिरंगा ध्वजासह विद्यापीठ प्रांगणात फेरी
काढण्यात आली. यावेळी प्रत्येक उपस्थिताच्या हातामध्येही तिरंगा ध्वज होता.
स्वातंत्र्यदिनाच्या आनंदाचा भारावलेला क्षणच जणू प्रत्येक जण अनुभवत होता.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे,
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी
अधिष्ठाता डॉ. श्रीमती एस.एच ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता
डॉ. श्रीकृष्ण महाजन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी
विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत
केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. डी.बी. सुतार, आजीवन अध्ययन विकास केंद्राचे संचालक
डॉ. ए.एम. गुरव, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. पी.टी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना
संचालक अभय जायभाये यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय
अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक
मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय
सेवा योजना कक्ष आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या वतीने कार्यक्रमाचे
नेटके नियोजन करण्यात आले.
No comments:
Post a Comment