शिवाजी विद्यापीठात सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञाग्रहण करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह अधिकारीवर्ग. |
कोल्हापूर, दि. २० ऑगस्ट:
शिवाजी विद्यापीठात आज सद्भावना दिनानिमित्त सामूहिक सद्भावना प्रतिज्ञाग्रहण
करण्यात आले.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७८व्या जयंतीनिमित्त आज देशभरात
सद्भावना दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिवाजी विद्यापीठातही सकाळी
सामूहिक सद्भावना प्रतिज्ञाग्रहण करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय
इमारतीच्या प्रवेशद्वारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत
झालेल्या या उपक्रमावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये यांनी सद्भावना
प्रतिज्ञेचे वाचन केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व
मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक
डॉ. आर.व्ही. गुरव, समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे, आजीवन अध्ययन
केंद्राचे संचालक डॉ. आण्णासाहेब गुरव, संगणक केंद्राचे प्रभारी संचालक अभिजीत
रेडेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment