Wednesday, 3 August 2022

क्रांतिसिंह नाना पाटील यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन



 

कोल्हापूर, दि. ३ ऑगस्ट: क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन परिषदेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये, प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख, डॉ. एन.ए. कांबळे, डॉ. श्रीमती एन.व्ही. वाळवेकर, डॉ. एस.आर. यन्कंची, कास्ट्राईबचे आनंद खामकर, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष मिलींद भोसले यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment