Wednesday, 24 August 2022

तंत्रज्ञान अधिविभागाच्या १७ विद्यार्थ्यांची

नामांकित कंपन्यांमध्ये निवड

 

Department of Technology

कोल्हापूर, दि. २४ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील केमिकल इंजिनिअरिंगमधील १७ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतींमधून विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली आहे.

शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील बी.टेक. अंतिम वर्षा (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिविभागात कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे काही कंपन्यांनी त्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयांत आणि व्हर्चुअल मुलाखतींच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.

त्यातून बी.टेक. केमिकल अभियांत्रिकीच्या अंकेष चौगुले, ओंकार माने, वाल्मिक पाटील, सोहम भोले, सचिन कदम, दिव्या गव्हाणे, विदयुल्लता धर्मे, ऋतुजा खडके, मीक्षा मोरे, साईराज शिंदे, श्रेयस मिठारी, श्याम पाटील, वैष्णवी महाडिक, प्रीतम जामदार, पियुष सिंग, अक्षय राठोड आणि प्रणव कदम या विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे.

यामध्ये टीसीएस (पुणे), इन्फोसिस (पुणे), इंजिनेरो टेक्नालॉजिज (ठाणे), ब्लॅक अॅन्ड विच इंडिया लिमिटेड (पुणे), डब्लूटीई इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. (पुणे), ल्काईल अमाइन्स केमिकल्स लि. (पुणे), विनवेज केमटेक (मुंबई) आणि ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस प्रा. लि. (सोलापूर) या केमिकल क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी. डी. पाटील, तंत्रज्ञान अधिविभागाचे ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. एस. बी. सादळे, डॉ. जे. डी. पाटील तसेच शिवाजी विद्यापीठाचे सेंट्रल ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. जी.एस. राशीनकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच केमिकल इंजिनिअरिंग अधिविभागातील डॉ. डी. एम. नांगरे, एस. एम. गायकवाड, . बी मडावी, पी. पी. पाटील, डॉ. आर. पी. कलनके, श्रीमती व्ही. एस. मोहिते आणि श्रीमती एस. पी. देहनकर यांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment