Monday, 1 August 2022

शिवाजी विद्यापीठात अण्णाभाऊ साठे आणि बॅ. खर्डेकर यांची जयंती उत्साहात


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. नंदकुमार मोरे आणि विलास सोयम.
 
बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. डी.बी. सुतार, डॉ. पी.बी. बिलावर, डॉ. एस.व्ही. थोरात, डॉ. खामकर, श्री. मातेकर आदी.


कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रामध्येही प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते बॅ. खर्डेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. रणधीर शिंदे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. डी.बी. सुतार, उपग्रंथपाल डॉ. पी.बी. बिलावर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. एस.व्ही. थोरात यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment