Monday, 15 August 2022

शिवाजी विद्यापीठात विभाजन विभीषिका स्मृती प्रदर्शन

 

शिवाजी विद्यापीठात विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त आयोजित डिजीटल प्रदर्शनाच्या पाहणी प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी.


कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात दि. १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळण्यात आला. या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात डिजीटल विभाजन विभीषिका स्मृती प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाची आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत १४ ऑगस्ट या विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त विद्यार्थी विकास विभाग व जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विभाजन विभीषिका स्मृती प्रदर्शन डिजीटल स्वरुपात आयोजित करण्यात आले. सदर प्रदर्शनाची पाहणी आज कुलगुरू डॉ.शिर्के यांनी केली. फाळणीचे दुःख मोठे आहे. भारतीय स्वातंत्र्याला या दुःखाची काळी किनार आहे. स्वातंत्र्य साजरे करीत असताना आपण त्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांबरोबरच या विभाजनावेळी प्राण गमवावे लागणाऱ्या व्यक्तींचेही स्मरण करणे आवश्यक आहे. या सर्वांना आदरांजली वाहू या, असे भावोद्गार त्यांनी या प्रसंगी काढले.

या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीमती एस.एच. ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. डी.बी. सुतार, क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड आणि राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये उपस्थित होते.

No comments:

Post a Comment