Tuesday 9 August 2022

क्रांतीदिनानिमित्त विद्यापीठात

क्रांतीवीरांना भावपूर्ण अभिवादन

शिवाजी विद्यापीठात क्रांतीदिनीनिमित्त क्रांतीस्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

शिवाजी विद्यापीठात क्रांतीदिनानिमित्त क्रांतीवनात वृक्षारोपण करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आदी.

शिवाजी विद्यापीठात क्रांतीदिनानिमित्त सामूहिक राष्टगीत गायन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. भारती पाटील, डॉ. आर.व्ही. गुरव आदी.


कोल्हापूर, दि. ९ ऑगस्टशिवाजी विद्यापीठात आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त क्रांतीवीरांच्या स्मृतींना भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. क्रांतीवीरांच्या स्मारकास अभिवादन, वृक्षारोपण आणि समूह राष्ट्रगीत गायन असे उपक्रम विद्यापीठात राबविण्यात आले.

विद्यापीठाच्या क्रांतीवनामधील स्मारकास सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आहुती देणाऱ्या क्रांतीवीरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या ‘अनामिका’ या देशासाठी आहुती देणाऱ्या तमाम अनाम क्रांतीवीरांना समर्पित कवितेचे वाचन डॉ. भारती पाटील यांनी केले. त्यानंतर कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते क्रांतीवनामध्ये भारतीय प्रजातीची विविध रोपे लावण्यात आली. सकाळी ठीक ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी विकास विभाग आणि संगीत व नाट्यशास्त्र विभाग यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

No comments:

Post a Comment