Wednesday, 30 March 2016
Tuesday, 22 March 2016
विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाकडे रत्नागिरी मानव विकास अहवालाचे काम
कोल्हापूर, दि. २२ मार्च: रत्नागिरी
जिल्हा मानव विकास निर्देशांकाचे मोजमाप करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या
अर्थशास्त्र अधिविभागाची निवड करण्यात आली आहे. पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)
व शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त
विद्यमाने या निर्देशांकाचे मोजमाप करण्यात येणार आहे.
यशदा येथे विकास
निर्देशांक मोजमापाचा कृती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने नुकतीच
कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विकास निर्देशांक मोजमाप
समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा मानव विकास
निर्देशांक अहवाल तयार करण्याच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ.
देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी 'यशदा' मानव विकास
केंद्राच्या संचालिका डॉ. मीनल नरवणे, अर्थशास्त्र
अधिविभाग प्रमुख व मानव विकास निर्देशांक मोजमाप समितीचे समन्वयक डॉ.
व्ही.बी. ककडे, प्रा.डॉ. एम.एस. देशमुख व इतर सदस्य उपस्थित होते.
विद्यापीठाचे सन २०१६-१७चे वार्षिक अंदाजपत्रक अधिसभेत मंजूर
कोल्हापूर, दि. २२ मार्च: शिवाजी विद्यापीठाचे सन २०१६-१७साठीचे वार्षिक अंदाजपत्रक, सन २०१५-१६चे सुधारित अंदाजपत्रक व मूल्यमापन अहवाल यांना आज अधिसभेत मंजुरी देण्यात आली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभा आयोजित केली होती. सचिवपदी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे होते.
सन २०१६-१७च्या वार्षिक अंदाजपत्रकात एकूण अपेक्षित जमा रु. ३६६.३३ कोटी असून अपेक्षित खर्च रु. ३७०.६६ कोटी इतका आहे.
याखेरीज शिवाजी विद्यापीठाचा सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील ५२वा वार्षिक अहवाल (मराठी आवृत्ती) मान्य करण्यात आला.
तसेच, निरंतर संलग्नीकरण देण्यासंदर्भात महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ नुसार तयार करण्यात आलेल्या परिनियम ३६० (१) कलम ८८ नुसार करण्यात आलेल्या सुधारणांना मान्यता देण्याबाबत व्यवस्थापन परिषदेने केलेली शिफारस मान्य करण्यात आली.
सन २०१६-१७च्या वार्षिक अंदाजपत्रकातील ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-
Saturday, 19 March 2016
ज्ञानरचनावादी संशोधनाचे लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज: डॉ. शेफाली पंड्या
कोल्हापूर, दि.19 मार्च: ज्ञानरचनावादी संशोधनाचे लाभ समाजातील वंचित
घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शेफाली पंड्या यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र
अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'ज्ञानरचनावादी अध्यापन शास्त्रातील संशोधने व प्रयोग' या विषयावरील दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेत बीजभाषण करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू
डॉ. डी.आर. मोरे होते, तर शिक्षण संहसंचालक डॉ. अजय साळी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पंड्या म्हणाल्या, प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत खऱ्या अर्थाने ज्ञानरचनावाद आणावयाचा असेल तर दोन गोष्टींची नितांत गरज आहे. त्या म्हणजे प्रथम सर्वच शिक्षण स्तरावरील शिक्षकांचा परंपरावादी शैक्षणिक दृष्टिकोन बदलावा लागेल आणि त्याचबरोबर या क्षेत्रातील संशोधनांवर विशेषत: ज्ञानरचनावादी मूल्यमापनासंदर्भातील संशोधनांवर भर द्यावा लागेल. ज्ञानरचनावाद या विषयातील काही संशोधनेही त्यांनी सादर केली.
डॉ. डी.आर. मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उच्च शिक्षणामध्ये ज्ञानरचनावाद कसा आणता येईल, याविषयी
चर्चा केली.
शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख
डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी स्वागत केले, डॉ. एम. एस. पद्मिनी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. चेतना सोनकांबळे यांनी आभार मानले. श्रीमती सुषमा कोंडुसकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी
डॉ. जी. एस. पाटील, डॉ. एन. आर. सप्रे, संशोधन विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात कुवेम्पु विद्यापीठ, शिमोगा
(कर्नाटक) येथील शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. पाटील यांनी ज्ञानरचनावादी अध्यापनशास्त्रासमोरील काही आव्हाने या विषयावर विचार मांडले. ज्ञानरचनावादी दृष्टीकोनाचा प्रत्यक्ष वापर करताना शिक्षक, अभ्यासक्रम
आणि प्रत्यक्ष समाज आदी स्तरांवर अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. त्यांची उत्तरे शोधणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या परिषदेत महाराष्ट्र, उत्तर
प्रदेश, कर्नाटक
राज्यांतील विविध विद्यापीठांमधून शिक्षणप्रेमी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सहभागी झाले आहेत. या दोन दिवसांत सुमारे 50 शोधनिबंधाचे वाचन आणि चर्चा होणार आहे.
Friday, 18 March 2016
विद्यापीठाच्या नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद व अण्णासाहेब डांगे महाविद्यालयांची बाजी
विद्यार्थ्यांमधील साहित्यिक कलागुणांना प्रोत्साहनासाठीच नियतकालिक स्पर्धा: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
कोल्हापूर, दि. १८ मार्च: महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा हा विद्यापीठाचा अभिनव व दर्जेदार उपक्रम असून विद्यार्थ्यांमधील साहित्यिक कलागुणांना प्रोत्साहित करण्याचे काम करीत
आहे, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.डॉ.देवानंद शिंदे यांनी केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या सन २०१४-१५च्या महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेचा पारितोषिक वितरण
समारंभ आज दुपारी व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते पार
पडला. त्यावेळी ते बोलत होते. बिगर व्यावसायिक गटात कोल्हापूरच्या विवेकानंद
महाविद्यालयाच्या 'विवेक' तर
व्यावसायिक गटात आष्टा (जि. सांगली) येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
ॲन्ड टेक्नॉलॉजीच्या 'ज्ञानदा' या
नियतकालिकांनी प्रथम क्रमांक मिळविले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना स्वत:ला शोधण्याची संधी मिळते. विषयाची मांडणी, लेखन, समाज प्रबोधनाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करुन देण्यासाठी प्राध्यापक, प्राचार्य आणि संस्थाचालकांनी प्रयत्न करावेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या व्यासपीठाचा उपयोग राष्ट्रीय पातळीवर यश मिळविण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सन २०१४-१५ मधील बिगर व्यावसायिक गट व व्यावसायिक गट यामधील गुणानुक्रमे प्रथम आलेल्या पहिल्या तीन महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा व नियतकालिकांच्या संपादकांचा यावेळी गुणगौरव करण्याबरोबरच त्यांना फिरते चषक प्रदान करण्यात आले.
स्पर्धेत ६८ बिगर व्यावसायिक महाविद्यालयांनी व २६ व्यावसायिक महाविद्यालयांनी भाग घेतला. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेले १२० विद्यार्थी व १४० विद्यार्थिनी अशा एकूण २६० जणांना विविध लेखांसाठी वैयक्तिक पारितोषिकेही प्रदान करण्यात येणार आहेत. विद्यापीठाची ही योजना १९७० सालापासून सुरु आहे.
यावेळी बीसीयुडी
संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य, एस.आर. पाटील (चिखली), प्राचार्य ए.के. गुप्ता (जयसिंगपूर) व प्रा. एन.आर. रानभरे (कोल्हापूर) यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले.
नियतकालिक
स्पर्धेतील सर्वसाधारण विजेती महाविद्यालये (कंसात नियतकालिक व संपादकाचे नाव या
प्रमाणे) अनुक्रमे अशी:-
बिगर व्यावसायिक गट:- विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर (विवेक; प्रा.नंदकुमार रामचंद्र रानभरे), देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक कला व विज्ञान महाविद्यालय,
चिखली, ता. शिराळा, जि. सांगली (अमर; डॉ.प्रकाश महादेव दुकळे), छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा (शिवविजय; प्रा.डॉ.शिवलिंग मेनकुदळे)
व्यावसायिक गट:- अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी, आष्टा (ज्ञानदा; प्रसाद दत्तात्रय कुलकर्णी), डी.के.टी.ई. सोसायटीचे
टेक्स्टाईल ॲन्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, इचलकरंजी (अंबर; आर.डी.शिर्के), डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर (व्हर्व; प्रशांत पा.पाटील).
Subscribe to:
Posts (Atom)