Saturday, 5 March 2016

समाजशास्त्र अधिविभाग आणि सेंटर फॉर सोशल स्टडीज, सुरत यांच्यात सामंजस्य करार




कोल्हापूर, दि. मार्च: शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र अधिविभाग आणि सुरत येथील सेंटर फॉर सोशल स्टडीज यांच्यामध्ये कुलगुरू प्रा.डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सामंजस्य करार करण्यात आला.
याअंतर्गत फॅकल्टी एक्सचेंज, सेमिनार, कॉन्फरन्सेसचे संयुक्तपणे आयोजन, संशोधन प्रकल्प, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्तपणे गेस्ट लेक्चर्सचे आयोजन, ग्रंथालय सुविधा या संदर्भात सहकार्य होणार आहे.  या करारावर सेंटरचे संचालक, डॉ.सत्यकाम जोशी आणि प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी स्वाक्षरी केली.  याप्रसंगी समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.आर.बी.पाटील आणि अन्य प्राध्यापक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment