विद्यार्थ्यांमधील साहित्यिक कलागुणांना प्रोत्साहनासाठीच नियतकालिक स्पर्धा: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
कोल्हापूर, दि. १८ मार्च: महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा हा विद्यापीठाचा अभिनव व दर्जेदार उपक्रम असून विद्यार्थ्यांमधील साहित्यिक कलागुणांना प्रोत्साहित करण्याचे काम करीत
आहे, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.डॉ.देवानंद शिंदे यांनी केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या सन २०१४-१५च्या महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेचा पारितोषिक वितरण
समारंभ आज दुपारी व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते पार
पडला. त्यावेळी ते बोलत होते. बिगर व्यावसायिक गटात कोल्हापूरच्या विवेकानंद
महाविद्यालयाच्या 'विवेक' तर
व्यावसायिक गटात आष्टा (जि. सांगली) येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
ॲन्ड टेक्नॉलॉजीच्या 'ज्ञानदा' या
नियतकालिकांनी प्रथम क्रमांक मिळविले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना स्वत:ला शोधण्याची संधी मिळते. विषयाची मांडणी, लेखन, समाज प्रबोधनाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करुन देण्यासाठी प्राध्यापक, प्राचार्य आणि संस्थाचालकांनी प्रयत्न करावेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या व्यासपीठाचा उपयोग राष्ट्रीय पातळीवर यश मिळविण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सन २०१४-१५ मधील बिगर व्यावसायिक गट व व्यावसायिक गट यामधील गुणानुक्रमे प्रथम आलेल्या पहिल्या तीन महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा व नियतकालिकांच्या संपादकांचा यावेळी गुणगौरव करण्याबरोबरच त्यांना फिरते चषक प्रदान करण्यात आले.
स्पर्धेत ६८ बिगर व्यावसायिक महाविद्यालयांनी व २६ व्यावसायिक महाविद्यालयांनी भाग घेतला. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेले १२० विद्यार्थी व १४० विद्यार्थिनी अशा एकूण २६० जणांना विविध लेखांसाठी वैयक्तिक पारितोषिकेही प्रदान करण्यात येणार आहेत. विद्यापीठाची ही योजना १९७० सालापासून सुरु आहे.
यावेळी बीसीयुडी
संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य, एस.आर. पाटील (चिखली), प्राचार्य ए.के. गुप्ता (जयसिंगपूर) व प्रा. एन.आर. रानभरे (कोल्हापूर) यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले.
नियतकालिक
स्पर्धेतील सर्वसाधारण विजेती महाविद्यालये (कंसात नियतकालिक व संपादकाचे नाव या
प्रमाणे) अनुक्रमे अशी:-
बिगर व्यावसायिक गट:- विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर (विवेक; प्रा.नंदकुमार रामचंद्र रानभरे), देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक कला व विज्ञान महाविद्यालय,
चिखली, ता. शिराळा, जि. सांगली (अमर; डॉ.प्रकाश महादेव दुकळे), छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा (शिवविजय; प्रा.डॉ.शिवलिंग मेनकुदळे)
व्यावसायिक गट:- अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी, आष्टा (ज्ञानदा; प्रसाद दत्तात्रय कुलकर्णी), डी.के.टी.ई. सोसायटीचे
टेक्स्टाईल ॲन्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, इचलकरंजी (अंबर; आर.डी.शिर्के), डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर (व्हर्व; प्रशांत पा.पाटील).
No comments:
Post a Comment