Tuesday 8 March 2016

स्त्री-भ्रूण हत्येचा कलंक पुसण्याची जबाबदारी सर्वांचीच: जिल्हाधिकारी डॉ.अमितकुमार सैनी






कोल्हापूर, दि. मार्च: कोल्हापूर जिल्ह्यावरील स्त्री-भ्रूण हत्येचा कलंक पुसण्याची जबाबदारी सर्वच नागरिकांची आहे. कोल्हापूरची पुरोगामी परंपरा अबाधित राखण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमितकुमार सैनी यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आयोजित महिला मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
शिवाजी विद्यापीठ, महिला आर्थिक विकास महामंडळ, कोल्हापूर, कृषि विज्ञान केंद्र, तळसंदे, नशाबंदी मंडळ हाराष्ट्र राज्य आणि ज्योती स्कील्स् अँड सर्व्हीसेस, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त बचत गटातील महिलांचा मेळावा विद्यापीठाच्या लोककला केंद्रा आयोजित केला होता. या मेळाव्यास बचत गटाच्या तीन हजारांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला.
जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचे नाव आता 'महिला आर्थिक, सामाजिक विकास मंडळ' होणे अधिक संयुक्तिक ठरेल. कोल्हापूर जिल्ह्याला स्त्री-भ्रूण हत्येचा कलंक लागला आहे. मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी झालेले आहे. या संदर्भात जागृती होणे आवश्यक आहे. महिला बचत गटांवर घरातील पुरुषांचे नियंत्रण असणे उचित नाही. असे कोठे घडत असेल तर, महिलांचे सक्षमीकरण करण्याची जबाबदारी 'माविम'ने स्विकारली पाहिजे. महिलांनी केंद्र सरकारच्या पंतप्रधान जीवन ज्योती, जीवन सुरक्षा या योजनांमध्ये त्वरित सहभाग नोंदविणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून प्रभावी कार्य चालू आहे. स्त्री शक्ती समाजाची प्रबळ प्रेरक शक्ती आहे. या शक्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांच्यामधील अंगभूत कौशल्यांचा विकास होणे आवश्यक आहे. आणि त्या कौशल्यांच्या आधारे समाजाची प्रगती करण्यासाठी योगदान देण्यास त्यांनी सज्ज होण्याची गरज आहे.
जिल्हा पोलिस धीक्षक प्रदीप देशपांडे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, केवळ ८ मार्च हाच दिवस महिला सक्षमीकरणाचा नसून वर्षातील र्वच दिवस महिला सक्षमीकरणाचे आहेत, असले पाहिजेत. महिलांनी स्वत:ला दुर्बल आणि कमजोर समजू नये. पोलिस मुख्यालया आजच महिला दिनानिमित्त 'प्रतिसाद' हा ॲप महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेला आहे. त्याचा महिलांनी योग्य वापर करावा. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडू नये. मुला-मुलींना समाजामध्ये होणाऱ्या त्रासापासून संरक्षण मिळण्याबरोबरच गरिब महिलांना मोफत कायदेशीर ल्ल्याची, समुपदेशनाची सोय उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बचत गटातील महिलांनीही मनोगते व्यक्त केली. बचत गटांच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्या मातोश्रींचा महिला दिनानिमित्त स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, डॉ.डी.के. गायकवाड, डॉ.गोरखनाथ कांबळे, डॉ.वासंती रासम, सौ.अनिता शिंदे, डॉ.ए.एम. गुरव, अमोल मडामे, वर्षा विद्या विलास, अभिनेत्री पूजा पवार उपस्थित होते. डॉ. सुमन बुवा यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment