(शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांची प्रवेश प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगाने या अधिविभागांची माहिती विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी थोडक्यात क्रमशः देत आहोत. तपशीलवार माहितीसाठी विद्यार्थी-पालकांनी संबंधित अधिविभागाशी संपर्क साधावा.- जनसंपर्क अधिकारी)
शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागातील शिक्षक, ग्रंथालयातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी. |
ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील गुणवत्तापूर्ण व दर्जेदार
शिक्षण देणारी संस्था तथा विभाग म्हणून म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालय व
माहितीशास्त्र अधिविभागाचा नावलौकिक आहे. या विभागाची स्थापना २२ जुलै, १९६४ रोजी झाली.
ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयामध्ये पदवी, पदव्युत्तर, एम.फिल. व पी.एचडी. या स्तरांवर
सुमारे ५६ वर्षे अव्याहतपणे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण अधिविभागामार्फत दिले जात
आहे.
ग्रंथालय व
माहितीशास्त्र या विषयातील बॅचलर ऑफ लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन सायन्स
(बी.एल.आय.एस्सी.) आणि मास्टर ऑफ लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन सायन्स
(एम.एल.आय.एस्सी.) हे नियमित अभ्यासक्रम अधिविभागामार्फत राबविले जातात. बी.लीब.आय.एस्सी. आणि
एम.लीब.आय.एस्सी. या अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता अनुक्रमे ४० आणि २० इतकी आहे. ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील संशोधनासाठी चालना देण्याच्या
उद्देशाने अधिविभागामार्फत एम.फिल. व पीएच.डी. या अभ्यासक्रमांची देखील
सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात
अधिविभागातील बी.एल.आय.एस्सी.
व एम.एल.आय.एस्सी. या अभ्यासक्रमांची सी.बी.सी.एस. प्रणालीनुसार
पुनर्रचना करण्यात आली आहे. शिवाय, एम.फिल. व पीएच.डी. कोर्सवर्कसाठी देखील सुधारित अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१
पासून लागू करण्यात आला आहे. सध्याच्या अभ्यासक्रमांमध्ये ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील आधुनिक
प्रवाहांशी सुसंगत, कौशल्य व प्रात्यक्षिकांवर आधारित असणाऱ्या विषयांचा
समावेश करण्यात आला आहे.
सध्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागात दोन डिजिटल क्लासरूम, हायस्पीड
इंटरनेट कनेक्टीव्हीटी व इतर अद्यावत सुविधा असणारी संगणक प्रयोगशाळा, प्रशासकीय
कार्यालय, फॅकल्टी/ रिसर्च फेलो केबीन्स, गर्ल्स कॉमनरूम इ. भौतिक सुविधा उपलब्ध
आहेत. प्रवेशित विद्यार्थ्यांना
विद्यापीठाच्या हॉस्टेल, ग्रंथालय, प्रशस्त अभ्यासिका, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,
हायस्पीड वाय-फाय इंटरनेट कनेक्शन इ. सारख्या महत्त्वपूर्ण सुविधांचाही लाभ मिळतो.
BLISc आणि MLISc या कोर्समध्ये प्रथम
येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत ‘श्री. बी.एन. केसकर’ पारितोषिक दिले
जाते. अधिविभागातील अनेक माजी
विद्यार्थी देशभरातील नामवंत विद्यापीठे, संशोधन संस्था व ग्रंथालयांमध्ये
प्राध्यापक, माहिती शास्त्रज्ञ व ग्रंथपाल इ. चांगल्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत. कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे यश हे त्या संस्थेतील
विद्यार्थ्यांच्या विकासावर अवलंबून असते. या अनुषंगाने अधिविभागातील ५५ हून अधिक विद्यार्थी आत्तापर्यंत ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील सेट/ नेट ही परीक्षा उत्तीर्ण झाले असून ते महाविद्यालय, विद्यापीठ, विशेष व तत्सम
प्रकारच्या ग्रंथालयांमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत अधिविभागातील ३६
विद्यार्थ्यांनी विद्यावाचस्पती (पी.एचडी.) ही संशोधन पदवी संपादन केली आहे.
विभागातील अनुभवी व निष्णात प्राध्यापकांबरोबर ग्रंथालय व
माहितीशास्त्र या विषयातील तज्ज्ञ व नामवंत साधन व्यक्तींच्या व्याख्यानांचेही आयोजन अधिविभागामार्फत केले जाते. चर्चासत्र, परिषदा, सेट/ नेट वर्कशॉप इ. सारख्या
उपक्रमांबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी वाचन कट्टा, क्वीझ
कॉम्पीटीशन, पोस्टर प्रेझेंटेशन, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, करियर समुपदेशन,
वैयक्तिक मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन विभागातर्फे नियमितपणे
केले जाते. विद्यार्थ्यांना
देशभरातील नामवंत ग्रंथालयांची प्रत्यक्ष माहिती होण्यासाठी अधिविभागामार्फत
दरवर्षी अभ्यास-सहलीचे आयोजित केले जाते.
नजीकच्या काळात ग्रंथालय व माहितीशास्त्र या क्षेत्रात कार्यरत
असणाऱ्या नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार (MoU)
करण्याचा अधिविभागाचा मानस आहे. याबरोबरच ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातील
विविध कोर्सेसचेही संयोजन अधिविभागामार्फत करण्यात येणार आहे.
अधिविभागातील कोर्सेस व त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता:
·
बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फरमेशन सायन्स
(बी.एल.आय.एस्सी.), शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेची पदवी
·
मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फरमेशन सायन्स
(एम.एल.आय.एस्सी.), शैक्षणिक अर्हता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची
बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फरमेशन सायन्स (बी.एल.आय.एस्सी.) पदवी
सदर कोर्सेससाठी प्रवेश घेऊ
इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण बाबी :
·
सदर कोर्सेससाठी विद्यापीठामार्फत प्रवेश परीक्षा घेतली जाते.
·
प्रवेश परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली जाते.
·
सविस्तर माहितीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावरील ‘Admission 2020’ या
लिंकला भेट द्या.
ग्रंथालय व
माहितीशास्त्र या विषयातील
करियरच्या संधी
ग्रंथालय व माहितीशास्त्र या अंतरविद्याशाखीय विषयातील पदवी व
पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, सार्वजनिक
ग्रंथालये, विशेष ग्रंथालये, संग्रहालये, माध्यम कार्यालये, शासकीय व निमशासकीय संस्था, संशोधन संस्था, खासगी संस्था, कार्पोरेट
कंपन्या, पुराभिलेखागार, भारतीय सैन्यदल, रुग्णालये, बँका व वित्तीय संस्था,
प्रकाशन संस्था, धार्मिक संस्था, परदेशी दूतावास
आदी ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, उप-ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल,
वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, माहिती व्यवस्थापक, माहिती विश्लेषक, माहिती अधिकारी,
माहिती शास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकारी, प्रलेखन अधिकारी, पुराभिलेख अधिकारी इ. सारख्या
अनेक संधी उपलब्ध आहेत.
याबरोबरच विविध संशोधन संस्थांमध्ये देखील ग्रंथालय व माहितीशास्त्र
विषयातील पदवीधारकांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पदव्युत्तर प्रशिक्षण व
सेट किंवा नेट ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण
झाल्यानंतर ग्रंथालय व माहितीशास्त्राच्या विद्यार्थांना महाविद्यालय,
विद्यापीठ व तत्सम प्रकारच्या ग्रंथालयांमध्ये ग्रंथपाल (‘शिक्षक’ समकक्ष) म्हणून
नोकरी करता येते.
अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी संपर्क :
डॉ. नमिता खोत
प्रभारी विभागप्रमुख,
ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग,
शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर
दूरध्वनी क्र. : ०२३१-२६०९२०७
ई – मेल : lib.infosc@unishivaji.ac.in
· डॉ. युवराज जाधव – सहाय्यक प्राध्यापक – मो.नं – ७३८५३६९३७८
· डॉ. सचिनकुमार बा.पाटील - सहाय्यक प्राध्यापक – मो.नं – ९७६६४८२७८२
No comments:
Post a Comment