Saturday 15 August 2020

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन साजरा

 


कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्याचा ७३ वा वर्धापनदिन आज शिवाजी विद्यापीठात साजरा करण्यात आला. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित शारीरिक अंतर राखून आजचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक तथा प्रभारी परीक्षा संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, प्रभारी अधिष्ठाता डॉ. व्ही.जे. फुलारी, डॉ. ए.एम. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, क्रीडा अधिविभागाचे डॉ. पी.टी. गायकवाड, डॉ. आर.के. कामत, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.

No comments:

Post a Comment