Saturday, 15 August 2020

शिवाजी विद्यापीठातील शिक्षण संधी-९: इतिहास अधिविभाग

गुणवत्तापूर्ण शिक्षण, दर्जेदार संशोधनासाठी लौकिक






इतिहास अधिविभागाचे स्वतंत्र ग्रंथालय





शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचा गुणवत्तापूर्ण शिक्षण व दर्जेदार संशोधन करणारा विभाग म्हणून सर्वदूर नावलौकिक आहे. विद्यापीठात पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या पदव्युत्तर अधिविभागांत इतिहास विभागाचा समावेश होता. ९ नोव्हेंबर १९६४ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे औपचारिक उद्घाटन झाले. मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक, व्यासंगी संशोधक डॉ. आप्पासाहेब पवार शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यांनी एक तपाहून अधिक काळ विद्यापीठाच्या कारभाराची धुरा सांभाळली. त्यामुळे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या भावी वाटचालीची त्यांच्या काळात भक्कम पायाभरणी झाली. आजही या विभागाचा देशभरात नावलौकिक झाला आहे.

सुरवातीच्या काळात (..१९७८ पर्यंत) मराठा इतिहास संशोधन कक्ष (Research Cell) इतिहास विभागाशी संलग्न होता. हा संशोधन कक्ष कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होता. या संशोधन कक्षामार्फत मराठ्यांच्या इतिहासावरील अनेक उत्तमोत्तम संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात शिवाजी विद्यापीठाची स्वतंत्र प्रतिमा तयार होण्याला त्यामुळे प्रारंभ झाला. विभागामध्ये पदव्युत्तर (एम..), एम.फिल, पी.एचडी, पी. जी. डिप्लोमा इन म्युझिऑलॉजी यामध्ये गेली ५५ वर्षे अव्याहतपणे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते आहे.

 

§  संशोधनाचे खास अभ्यासक्षेत्र:

Ø  मराठ्यांचा इतिहास

Ø  दक्षिणी संस्थानांचा इतिहास

Ø  आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास

 

§  ठळक वैशिष्ट्ये:-

·         प्रकाशित ग्रंथ (अधिविभागातील आजी आणि माजी शिक्षकांकडून): १७

·         मराठा इतिहास संशोधन केंद्राची स्थापना (जून२००३):

डॉ. आप्पासाहेब पवार यांनी सुरू केलेली मराठ्यांच्या इतिहासातील संशोधनाची परंपरा पुनरुज्जीवित करून पुढे वाढविणे हा या केंद्राचा उद्देश आहे. या केंद्राचे नामाभिधान “छत्रपती शाहू महाराज सेंटर फॉर स्टडीज ऑफ मराठा हिस्टरी” असे केले आहे.


·     शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद (जून१९९३): शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाने इतिहास संशोधन व अध्ययनाला प्राधान्य देणारे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी इतिहास परिषदेची स्थापना केली. या परिषदेचे कामकाज विद्यापीठाच्या इतिहास विभागातूनच चालते. शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेची आजवर २३ अधिवेशने झाली असून १३ शोधनिबंध संग्रहही प्रकाशित झाले आहेत.

·         सामंजस्य करार (MoU):

o आधुनिक इतिहास ज्ञानमंडळ व इतिहास अधिविभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार (२०१७-२०२०).  इतिहास अधिविभागातील संशोधक/ प्राध्यापकांकडून सुमारे १०० नोंदीचे मराठी विश्वकोशामध्ये लेखन.

o  सरफोजीराजे दुसरे- सरस्वती महाल ग्रंथालय आणि तमिळ विद्यापीठ, तंजावर यांच्याशी सामंजस्य करार प्रस्तावित.


·         आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे/ International Collaboration:


. दख्खनचा इतिहास या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र (६ ते ८ डिसेंबर, २००५)

. थर्ड वर्ल्ड स्टडीज आणि इतिहास अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय चर्चासत्र (डिसेंबर २०१६)

. GIAN COURSE: मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व्या शतकातील दख्खन या विषयावर ऑगस्ट २०१६मध्येग्यान कोर्सचे आयोजन. (मार्गदर्शक:- डॉ. स्टीवर्ट गॉर्डन, प्रोफेसर, मिशिगन विद्यापीठ, अमेरिका)

. निमंत्रित परदेशी शिक्षक:- डॉ. स्टीवर्ट गॉर्डन, प्राध्यापक, मिशिगन विद्यापीठ, अमेरिका. रिसर्च प्रोफेसर इतिहास अधिविभाग, सन २०१९- २०२०.


·         कौशल्याधारित उपक्रम:

. पी. जी. डिप्लोमा इन म्युझिऑलॉजी

       . मोडी लिपीतील सर्टीफिकेट कोर्स 

· व्हॅल्यू अॅडेड कोर्स (Value Added Courses):-

१. स्पर्धा परीक्षांसाठी इतिहास” (ऑक्टोबर २०१९)

२. वैज्ञानिकांसाठी इतिहास” ( मार्च २०२०)

 

§  अभ्यासक्रम पुनर्रचना: सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विभागातील एम. . भाग- I आणि II या अभ्यासक्रमांची सी.बी.सी.एस. प्रणालीनुसार पुनर्रचना करण्यात आली आहे. तसेच एम.फिल. व पीएच.डी. कोर्स वर्कसाठी देखील सुधारित अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून लागू करण्यात आले आहे. सध्याच्या अभ्यासक्रमात इतिहास या विषयातील आधुनिक प्रवाहांशी तसेच इतिहासातील नवीन विचारप्रवाहांशी सुसंगत विषयांचा समावेश केला आहे.


§  अधिविभागामध्ये उपलब्ध सुविधा:

·         डिजीटल क्लासरूम, हायस्पीड इंटरनेट, मोबाईल फोनसाठी वाय-फाय कनेक्टिव्हिटी

·         अद्ययावत सुविधा असणारी संगणक प्रयोगशाळा, प्रशासकीय कार्यालय

·         स्वतंत्र सभागृह

·         रिसर्च फेलोंसाठी स्वतंत्र केबिन्स

·         विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासखोली

·         विभागाचे स्वतःचे स्वतंत्र छोटेखानी ग्रंथालय

·         जुनी दुर्मिळ कागदपत्रे, पेंटिंग्ज, नाणी व प्राचीन अवशेषांचा संग्रह

·         प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वसतिगृह, ग्रंथालय, प्रशस्त अभ्यासिका, खेळाचे मैदान, हायस्पीड वाय-फाय इंटरनेट कनेक्शन इ. सारख्या महत्त्वपूर्ण सुविधांचाही लाभ.

 §  विद्यार्थीकेंद्री उपक्रम:

·         नामवंत व तज्ज्ञ साधन व्यक्तींची व्याख्याने

·         विविध आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय चर्चासत्र आणि परिषदांत सहभागाची संधी

·         स्पर्धापरीक्षा व नेट/सेट परीक्षांसाठी कार्यशाळा

·         वृक्षारोपण, गडकोट व विद्यापीठ परिसर स्वच्छता मोहिम, सांस्कृतिक कार्यक्रम इ. उपक्रम

·         क्वीझ कॉम्पिटीशन, पोस्टर प्रेझेन्टेशन, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण

·         करियर समुपदेशन व वैयक्तिक मार्गदर्शन

·         नवोदित संशोधकांना मराठ्यांच्या इतिहासात नवीन संशोधन करणे सुलभ व्हावे यासाठी मोडी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन.

·         इतिहास विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यासाठी श्रीमती सीताबाई कुलकर्णी पारितोषिक

·         दरवर्षी अभ्यास-सहल


§  इतिहास अधिविभागातील कोर्सेस व त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता:


कोर्सचे नाव

प्रवेश क्षमता

पात्रता

एम. . भाग –I

५५

इतिहास विषयातील पदवी

एम. . भाग –II

५०

एम. . भाग –I टर्मवर्क पूर्ण

पी. जी. डिप्लोमा इन म्युझिऑलॉजी

४०

कोणत्याही शाखेची पदवी

एम. फिल.

मार्गदर्शकांच्या उपलब्धतेनुसार

एम. .

पीएच.डी.

मार्गदर्शकांच्या उपलब्धतेनुसार

एम..

 

    सदर कोर्सेससाठी विद्यापीठामार्फत प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात राबविली जाते. सविस्तर माहितीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावरील ‘Admission 2020’ या लिंक ला भेट द्या.


§  इतिहास विषयातील नोकरी/ रोजगाराच्या संधी:

इतिहास अधिविभागातील पदव्युत्तर शिक्षण विद्यार्थ्यांचे विचार, संशोधन आणि लेखन करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करते. इतिहासाचे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थी संशोधन करण्याचे कौशल्य, स्वतंत्रपणे व विश्लेषणात्मक विचार करण्याची सवय, आणि लेखी आणि बोली भाषेत माहिती देण्याची कौशल्ये शिकतात. या सर्व कौशल्यांचा त्यांना करियर करण्यासाठी उपयोग होतो. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना संशोधन (पीएच.डी.), शिक्षण (नेट-सेट) आणि सरकारी नोकरी (स्पर्धा परीक्षा) या पारंपरिक क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना टुरिझम, म्युझिऑलॉजी, आणि हेरिटेज कंजर्वेशन या नवीन क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आत्मसात केलेल्या कौशल्यांचा उपयोग त्यांना इतर क्षेत्रांत नोकरी करताना देखील होतो.

इतिहास विभागातील विद्यार्थ्यासाठी नेट/सेट आणि तत्सम अन्य स्पर्धा परीक्षांकरिता पूर्वतयारी करून घेण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये रेमिडीयल कोचिंग प्रोग्रॅम, विविध कार्यशाळा, तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने इ. बाबींचा समावेश असतो. विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांचे परिश्रम यांचा परिपाक म्हणजे या विभागातील ५०हून अधिक विद्यार्थी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क:-

विभागप्रमुख, इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

दूरध्वनी क्र.०२३१-२६०९२००/९१९८

ईमेल: history@unishivaji.ac.in


No comments:

Post a Comment