Thursday, 20 August 2020

शिवाजी विद्यापीठातील शिक्षण संधी-१३: औद्योगिक रसायनशास्त्र विभाग

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकमेव विभाग

 

औद्योगिक रसायनशास्त्र विभागाचे शिक्षक (डावीकडून) डॉआर.एममानेप्राकेएमगरडकर 
(समन्वयक)एस.व्ही किटेडॉएस.बीतेली.आरकुळदीप.

औद्योगिक रसायनशास्त्र विभागाची सुसज्ज प्रयोगशाळा


भारतात रोजगार निर्मिती आणि निर्याती धोरणामधील योगदानामुळे रासायनिक उद्योधंद्याना भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट स्थान आहे. जागतिक बाजारपेठेतील भारताचा वाटा नैसर्गिक संसाधनावर आधारि असूनही तो कमी आहे. म्हणूनच, औद्योगिक रसायनशास्त्रातील तज्ज्ञांनी जागतिक बाजारपेठेमध्ये भारताला विशिष्ट स्थान निर्माण करून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी औद्योगिक प्रक्रियेच्या विविध विभागांमध्ये भांडवल गुंतवणूक आणि आधुनिकीकरण यावर जोर दिला आहे.

भारतीय उद्योधंद्याची गरज लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने सन १९९३-९४ या शैक्षणिक वर्षापासून रसायनशास्त्र अधिविभागा औद्योगिक रसायनशास्त्र विषयामध्ये एम.एस्सी. अभ्यासक्रम सुरु केला. विज्ञान पदवीधारकांना तांत्रिक तज्ज्ञ, संशोधक आणि गुणवत्ता नियंत्रक म्हणून सेवा बजावण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दे देशातील रासायनिक उद्योगधंद्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरवून देशाच्या विकासाला हातभार लावणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवून हा अभ्यासक्रम सुरु आहे. या विषयाचा विद्यापीठ परिक्षेत्रामधील हा एकमेव अभ्यासक्रम आहे. शिवाजी विद्यापीठाने योजिलेले हे उद्दिष्ट साध्य करत अनेक विद्यार्थ्यांनी भारतात तसेच भारताबाहेर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्ती करून विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

बी.एस्सी. रसायनशास्त्र विषयात किमान ५५% गुणांसह शिवाजी विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण विद्यार्थी एम.एस्सी. औद्योगिक रसायनशास्त्र विभागा प्रवेश घेऊ शकतात. या विभागा दरवर्षी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. विभागासाठी सुसज्ज इमारत प्रयोगशाळा असून ज्ज्ञ अनभवी प्राध्यापक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे पार पाडत आहेत. विभागाचे वेगेळेपण म्हणजे या विभागाचा अभ्यासक्रम पूर्णतः उद्योगधंद्यांना पूरक असून बदलत्या काळानुसार वेळोवेळी अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल केल जातात. रंग, रंगद्रव्ये, अन्न प्रक्रिया, डेअरी व्यवसाय, गूळ आणि साखर कारखाने, तेल, साबण, डिटर्जंट्स, पेंट्स, शाई, लेदर केमिस्ट्री, सौंदर्यप्रसाधने आणि परफ्यूम अशा अनेक घटकांचा अभ्यासक्रमात समावेश असून त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिके येथे घेतली जातात. विविध प्रकारचे नॅनो-मटेरिअल्स तयार करून त्याचे कृषी क्षेत्रातील  योगदान,  गॅस आणि इंधन विश्लेषण, औषधे, फार्मास्यटिकल्स आणि फार्मास्युटिकल्सचे विश्लेषण, धातूशास्त्र, फार्मास्युटिकल रसायनशास्त्रात अजैविक यौगिकांचे योगदान, सेन्सर तंत्रज्ञान, जल, मृदू, ध्वनी, हवा प्रदूषण आणि व्यवस्थापन अशा अनेक घटकांचा समावेश अभ्यासक्रमात आहे. प्रयोगशाळे विविध प्रकारची अद्यावत उपकरणे उपलब्ध असून विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. जे विद्यार्थी एम.एस्सी.नंतर पीएच.डी. ला प्रवेश घेतात त्यांच्या संशोधनाला चालना म्हणून दरवर्षी एका विद्यार्थ्याला तीन वर्षांच्या कालावधीसाठी डिपार्टमेंटल रिसर्च फेलोशिप दिली जाते.

हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रा रोजगाराची संधी उपलब्ध होतात. एम.एस्सी. औद्योगिक रसायनशास्त्र हा शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकमेव विभाग असून अनेक विद्यार्थी नेट, सेट आणि पीएच.डी. पदव्या घेऊन वरिष्ठ महाविद्यालया प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. काही विद्यार्थी नामांकित राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळेत तंत्रज्ञ ते शास्त्रज्ञ आदी दांवर कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत. या विभागाचे  विद्यार्थी सन फार्मा,  डॉ. रेड्डीज फार्माक्युटिकल, सिप्ला फार्मा, ऑरोबिंडो फार्मा, टॉरंट फार्मा, ल्युपिन फार्मा, ग्लेनमार्क, अॅबॉट इंडिया अशा नामांकित केमिकल इंडस्ट्रीजमध्ये तंत्रज्ञ ते व्यवस्थापक आदी दांवर कार्यरत आहेत. पेट्रोकेमिकल्स, पॉलिमर, प्लास्टिक फूड, सौंदर्यप्रसाधने, फार्मास्युटिकल, खनिजे अशा अनेक उद्योगधंद्यामध्ये संशोधन वैज्ञानिक, तांत्रिक प्रतिनिधी, प्लांट मॅनेजर, प्रोडक्शन प्रोसेस मॅनेजर, फ्युएल डेव्हलपमेंट केमिस्ट, ऑपरेशन्स मॅनेजर या पदावर अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना रोजगार मिळाल आहे.

विभागातील काही माजी विद्यार्थ्यांची माहिती पुढीलप्रमाणे:

. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी (वरिष्ठ महाविद्यालय, मुरुम, लातूर),

. योगेश वाघ (एम-क्यूर, फार्मा, पुणे),

. डॉ. दत्तात्रय चव्हाण (व्यवस्थापक, फार्मा, हैदराबाद),

. विपुल गायकवाड (अधिकारी, केंद्र सरकार कार्यालय, एमआयडीसी, कोल्हापूर),

. अजित घाटगे (सिंजेंटा, बेंगलोर),

. शरद निकम (रेड्डी लॅब, हैदराबाद),

. सूर्यकांत भोसले (रिलायन्स इंडस्ट्रीज, तळोजा, मुंबई),

. सुरेश माळी (एसयूएन फार्मा, औरंगाबाद),

. डॉ. सुशील जाधव (सहाय्यक प्राध्यापक, नॅनोसायन्स विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर),

१०. डॉ. रजनीकांत कुरणे (सहयोगी प्राध्यापक, आरआयटी, इस्लामपूर),

११. डॉ. अभिजीत जगताप, मॅनेजर,पेरॉमल इंडस्ट्री, मुंबई),

१२. डॉ. ओंगेरा गिलबर्ट (प्राध्यापक, युनिव्हर्सिटी ऑफ कॅबीगा, केनिया). 

या विभागाचा उद्देश केवळ रोजगार उपलब्ध करून देणे इतकाच नसून अनेकांना स्वतःचे उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. विभागाचा मुख्य उद्देश साध्य करीत अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योगधंदे यशस्वीरित्या सुरु केले आहेत. या विभागासाठी रसायनशास्त्र विभागातील कार्यरत प्राध्यापक, नामवंत शास्त्रज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रथितयश उद्योगपती यांचे व्याख्यान आयोजित केले जाते. विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्योगक्षेत्रातील नुभव येण्यासाठी द्वितिय वर्षाच्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांचे औद्योगिक प्रशिक्षण त्यांच्या आवडीनुसार त्या त्या औद्योगिक विभागात दिले जाते. (पुणे, मुंबई, गोवा, हैद्राबाद, कोल्हापूर, सांगली येथील औद्योगिक कारखाने)

औद्योगिक रसायनशास्त्र विभागाविषयी अधिक माहितीसाठी संपर्काचा पत्ता खालीलप्रमाणे:-

प्रा. के. एम. गरडकर,

समन्वयक,

औद्योगिक रसायनशास्त्र विभाग,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

कार्यालय फोन नं: ०२३१ - २६०९१६७

मेल: indchem@unishivaji.ac.in


No comments:

Post a Comment