Tuesday, 18 August 2020

शिवाजी विद्यापीठातील शिक्षण संधी-११: वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग

व्यवसाय शिक्षणातील नामवंत अधिविभाग

 

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाची सुसज्ज स्मार्ट क्लासरुम.



अधिविभागाच्या उपक्रमात सहभागी झालेले शिक्षक व विद्यार्थी.

 

शिवाजी विद्यापीठा वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाची स्थापना १९९० मध्ये करण्यात आली. सध्या या अधिविभागात एम. कॉम., पी. जी. डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, पी. जी. डिप्लोमा इन फरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट, एम. फील. आणि पीएच. डी. हे अभ्यासक्रम सुरु आहेत. वाणिज्य शाखेतील पदवीधरांना पदव्युत्तर शिक्षण देतानाच करिअर व रोजगार संधी तसेच संशोधन व कौशल्य विकासाच्या संधी याबाबतही विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. 

  

अ.क्र.

अभ्यासक्रम

प्रारंभ वर्ष

उपलब्ध जागा

पात्रता

एम. कॉम.

१९९०

५०

बी. कॉम.

पी.जी.डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स

२००८-०९

५०

कोणताही पदवीधर

पी.जी.डिप्लोमा इन ट्रेझरी अँड फॉरेक्स मॅनेजमेंट

२००८-०९

२५

कोणताही पदवीधर

एम. फिल.

(कॉमर्स, अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट, बिझनेस इकॉनॉमिक्स)

१९९०

मार्गदर्शकांकडील जागेच्या मागणीच्या उपलब्धतेनुसार

एम. कॉम., एम. बी. ए., किंवा समकक्ष पद्वित्त्युर पदवी

पीएच. डी.

(कॉमर्स, अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट, बिझनेस इकॉनॉमिक्स)

१९९०

 

एम. कॉम. कोर्सेससाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश दिला जातो. सविस्तर माहितीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेस्थळावर ‘Admission 2020’ या लिंकला भेट द्या.

एम. कॉम. अभ्यासक्रमामध्ये व्यवसाय व्यवस्थापन (Business Management), संघटनात्मक वर्तणूक (Organizational Behaviour), व्यवस्थापकीय अर्थशास्त्र (Managerial Economics), आंतरराष्ट्रीय व्यवसाय (International Business), व्यवस्थापकीय लेखांकन (Management Accounting), व्यवस्थापकीय नियंत्रण प्रणाली (Management Control System), व्यवसायिक वित्त (Business Finance) आणि वित्तीय व्यवस्थापन (Financial Management) या सक्तीच्या विषयांबरोबरच अॅडव्हान्स्ड अकाउंटन्सी, अॅडव्हान्स्ड कॉस्टिंग टॅक्सेशन हे स्पेशलायझेशन (ऐच्छिक विषय) उपलब्ध आहे. वाणिज्य पदवीधर (बी.कॉम.) विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेशास पात्र आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये असणारे विविध विषय सनदी लेखापाल (सी. .), कंपनी सचिव (सी. एस.) या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी पूरक ठरतात. त्यामुळेच विभागातून यापूर्वी अनेक विद्यार्थी सीए, सीएस अभ्यासक्रम पूर्ण करून व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. त्याबरोबरच बँकिंग वित्तीय सेवांमध्येही अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त नेट सेट या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये अधिविभागाच्या विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. या विभागातील बहुसंख्य विद्यार्थी बँकिंग शिक्षण क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. या दोन्ही क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी याबाबत तसेच एकूण करिअरबाबत सातत्याने मार्गदर्शन केले जाते. बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक ते बदल संबंधित अभ्यास मंडळामार्फत केले जातात. तसेच विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमाबरोबरच करियर, उद्योजकता, रोजगार, संशोधन कौशल्य विकास याबाबत मार्गदर्शन केले जाते.

 व्यवसायिक अभ्यासक्रम:

सन २००४ मध्ये व्यवस्थापन क्षेत्रातील संधींचा विचार करून एम.बी.. हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. एम. कॉम. या पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच व्यवसायिक अभ्यासक्रम असावा, असा त्यामागे हेतू होता. सन २००८ मध्ये वाणिज्य शाखेतील पदवीधरांसाठी संगणक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगारसंधी लक्षात घेता मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (एमसीए) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. याच वर्षी पी.जी.डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स पी.जी.डिप्लोमा इन ट्रेझरी अँड फॉरेक्स मॅनेजमेंट हे दोन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. यातून बँकिंग क्षेत्रामध्ये वित्तीय सेवांमध्ये रोजगार करिअरच्या संधी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.  

 संशोधन:

अधिविभागाच्या सुरुवातीपासूनच एम.फिल. पीएच.डी. हे संशोधनपर अभ्यासक्रम राबवले जात आहेत. २००९ पासून संशोधनाच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरु केले. संशोधन पद्धती व संख्यात्मक तंत्रे यांवरील कार्यशाळा आयोजित करून सातत्याने संशोधक विद्यार्थी व शिक्षक यांच्या क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षा संशोधनाच्या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोग यांच्याकडून वेळोवेळी सुचवलेल्या सुधारणा प्रभावीपणे राबविल्या आहेत. संशोधनाला गुणवत्तेची जोड मिळण्याच्या उद्देशाने एम.फिल. पीएच.डी. अभ्यासक्रमांमध्ये संशोधन प्रस्ताव सादरीकरण, त्यातील सुधारणा, कोर्सवर्क, सहामाही सादरीकरण आणि प्रबंधाची छानणी करून त्याची गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली, भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व बँक ऑफ इंडिया इत्यादी संस्थांकडून मिळालेल्या अर्थसहाय्यातून संशोधन प्रकल्प पूर्ण झाले आहेत. संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राजीव गांधी राष्ट्रीय संशोधन छात्रवृत्ती, मौलाना आझाद संशोधन छात्रवृत्ती व कनिष्ठ व वरिष्ठ संशोधन छात्रवृत्ती प्राप्त झाल्या असून भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषदेची संशोधन छात्रवृत्ती प्राप्त झाल्या आहेत. वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेतील संशोधन अधिकाधिक गुणवत्तापूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजपर्यंत या अधिविभागामार्फत राष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा, चर्चासत्रे व कार्यशाळा यांचे आयोजन केले आहे. तीन आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन या अधिविभागाने केले आहे. वाणिज्य व्यवस्थापन अधिविभाग विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यांसाठी एकमेव संशोधन केंद्र म्हणून मान्यताप्राप्त आहे.

 

कौशल्य विकास:

वाणिज्य व्यवस्थापन विभागामध्ये कौशल्य उद्योजकता विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामार्फत विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी तसेच विविध सेवांमध्ये पदवीधरांसाठी आवश्यक असलेली कौशल्ययाबाबत मार्गदर्शन केले जाते. उद्योजकता विकास, सनदी लेखापाल, कंपनी सचिव, बँकिंग व वित्तीय क्षेत्र, राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या लेखापाल, लेखा लिपिक, लेखा सहाय्यक, लेखाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील सहाय्यक प्राध्यापक अशा अनेक पदांसाठी या अधिविभागाचे अभ्यासक्रम उपयुक्त ठरत आहेत.

 

प्रशिक्षण:

महाविद्यालयातील व विद्यापीठातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य अधिविभागाकडून केले जाते. समर स्कूल व शॉर्ट टर्म प्रोग्राम इत्यादींचे आयोजन अधिविभागाने वेळोवेळी केले आहे.

उद्योजकता विकास, संशोधन पद्धती व व्यवस्थापकीय विकास यावरील कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

 

अध्यासने:

वाणिज्य व्यवस्थापन अधिविभागांतर्गत बँकिंग वित्तीय क्षेत्रातील संशोधनासाठी दोन अध्यासने कार्यरत आहेत.

1.       युनायटेड वेस्टर्न बँकेचे रा. ना. गोडबोले अध्यासन (वित्तीय व्यवस्थापन अधिकोष संशोधन) हे सन २००० पासून अस्तित्वात आहे. या अध्यासनामार्फत आजपर्यंत सुमारे पंधरा चर्चासत्रे कार्यशाळांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच, या अध्यासनामार्फत विविध विषयांवरील वीस पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आलेले आहे. दरवर्षी सहा डिसेंबर रोजी रा.ना. गोडबोले स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. याराष्ट्रीय पातळीवरील अर्थतज्ज्ञ व्यक्तीस मार्गदर्शनासाठी पाचारण करण्यात येते.

2.       बँक ऑफ इंडिया अध्यासन हे रुरल बँकिंग या विषयातील अध्यासन सन २००४ पासून कार्यरत आहे. तसेच स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था यामार्फत बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन करण्याची सोय आहे.

या अधिविभागाचे अनेक माजी विद्यार्थी अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे कृषी निर्यात सल्लागार, स्टार्टअप सल्लागार, मुंबई महानगरपालिकेतील लेखापरीक्षक, अनेक सनदी लेखापाल, कंपनी सचिव, महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक आणि बँक अधिकारी पदावर कार्यरत आहेत. 

सुरुवातीच्या काळात एक समन्वयक  २५  विद्यार्थी इतका मर्यादित असलेला हा अधिविभाग आज पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करत आहे. विभागातील शिक्षक अध्यापन तसेच संशोधनामध्ये सातत्याने व्यग्र असतात. गेल्या काही वर्षा संशोधनाच्या बाबतीत आरजी स्को, सायटेशन अशा काही मानकांबाबतही उल्लेखनीय प्रगती होत आहे. याव्यतिरिक्त विभागामार्फत संशोधनपूरक कन्सल्टन्सी करण्याचा त्यामार्फत उद्योग जगत शिक्षण क्षेत्र यांना जोडण्याचा मानस आहे. विभागप्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. अधिविभागाचे कार्य विचारात घेऊन दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया, नवी दिल्ली व भारतीय समाजविज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली या संस्थांनी अधिविभागास सहकार्य केले आहे. महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला हा अधिविभाग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही आता लौकिक प्राप्त करतो आहे.

 

संपर्क:

प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन

प्राध्यापक विभागप्रमुख,

वाणिज्य व्यवस्थापन अधिविभाग,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

 

-मेल: कार्यालय  commerce@unishivaji.ac.in

विभागप्रमुख  ssm_commerce@unishivaji.ac.in

दूरध्वनी: ०२३१-२६०९१७३/ २६०९१७४

7 comments:

  1. Great... I feel proud because I am the ex-student of this Department of Commerce and Management... Best wishes to Department.

    ReplyDelete