(शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांची प्रवेश प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगाने या अधिविभागांची माहिती विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी थोडक्यात क्रमशः देत आहोत. तपशीलवार माहितीसाठी विद्यार्थी-पालकांनी संबंधित अधिविभागाशी संपर्क साधावा.- जनसंपर्क अधिकारी)
शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग |
प्रसारमाध्यमांचे विश्व हे प्रचंड व्यापक आहे. या
क्षेत्रातील ग्लॅमर आजकाल प्रत्येक युवक-युवतीला भुरळ घालते आहे. या क्षेत्रातील
रितसर शिक्षण व प्रशिक्षण शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र
अधिविभागात दिले जाते. विद्यापीठाच्या या सुवर्णमहोत्सवी अधिविभागातील उपलब्ध
अभ्यासक्रमांची व विविध संधींची माहिती थोडक्यात पुढीलप्रमाणे:-
अ) जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन विभागातील अभ्यासक्रम :
1. एम.ए. मास कम्युनिकेशन : (2 वर्षे, 4
सेमिस्टर)
2. एम.जे: (2 वर्षे, 4
सेमिस्टर)
3. बी.जे.: (1 वर्षे, 2
सेमिस्टर)
4. शॉर्ट टर्म कोर्सेस: रायटिंग
फॉर मीडिया.
5. पी.जी. डिप्लोमा
इन सायबर जर्नालिझम
6. एम.फिल.
7. पीएच.डी.
ब) अभ्यासक्रमासाठी
लागणारी शैक्षणिक पात्रता :
·
कोणत्याही विषयाचे पदवीधर प्रवेश
परीक्षेतून पात्र झाल्यावर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.
·
वयाची अट नाही.
·
विद्यापीठ नियमाप्रमाणे
वर्गातील उपस्थिती आवश्यक.
·
सर्व अभ्यासक्रम हे
व्यावसायिक असल्याने दिलेली प्रॅक्टिकल्स वेळेवर सादर करणे आवश्यक.
·
एम.जे/मास कम्युनिकेशन
विद्यार्थ्यांसाठी लघुप्रबंध (डेझर्टेशन), स्टडी टूर व इतर सर्व प्रॅक्टिकल्स अनिवार्य.
क) रोजगाराच्या संधी:
·
डिजिटल मीडियात विविध पदांवर
काम करण्याची संधी.
·
वृत्तपत्रे व मासिके या
प्रिंट मीडियामध्ये करिअरच्या संधी.
·
आकाशवाणी, एफ.एम., रेडियो.
·
टेलिव्हिजन चॅनल्स.
·
जनसंपर्क क्षेत्रात जनसंपर्क
अधिकारी होण्याची संधी.
·
जाहिरात क्षेत्रात संधी.
·
कार्पोरेट क्षेत्रात कम्युनिकेशन
स्पेशालिस्ट.
·
विभागातील विविध उपक्रम, वर्कशॉप, सेमिनार्स, कॉन्फरन्स
यामध्ये सहभागी होण्याची संधी.
·
‘रिसर्च जर्नल’मध्ये सहभागी होण्याची संधी.
·
‘माध्यमविद्या’,
‘संज्ञापक’, ‘मीडिया स्पेक्ट्रम’ या
प्रायोगिक प्रकाशनात संधी.
ड) संशोधन व कौशल्य:
·
विविध माध्यमांसाठी लागणारे
बेसिक स्कील.
·
फोटोग्राफी व डाक्युमेंट्री
यासाठीचे कौशल्य,
निवेदन कौशल्य.
·
व्यक्तिमत्व विकास व आत्मविश्वास
वाढीस मदत.
·
संवाद कौशल्य आत्मसात
करण्याची संधी.
·
एफ.फिल, पीएच.डी. संशोधक
विद्यार्थ्याना माध्यम संशोधनात वाव.
·
शासकीय व खासगी क्षेत्रात
संवादतज्ज्ञ होण्याची संधी.
·
प्रॅक्टिकलवर आधारित
अभ्यासक्रम.
No comments:
Post a Comment