Tuesday, 11 August 2020

शिवाजी विद्यापीठातील शिक्षण संधी-५: संख्याशास्त्र अधिविभाग

संख्याशास्त्रातील अध्यापन-संशोधनासाठी राष्ट्रीय स्तरावर ओळख

 

संख्याशास्त्र अधिविभागाची इमारत

संख्याशास्त्र अधिविभागातील स्मार्ट क्लासरुम

संख्याशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी कार्यरत असणाऱ्या काही निवडक आस्थापना

शिवाजी विद्यापीठात संख्याशास्त्र अधिविभाग सन १९८२ साली स्थापन झाला. हा अधिविभाग संख्याशास्त्रातील ज्ञानदानासाठी संशोधन कार्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ओळखला जातो. या अधिविभागातून शिक्षण घेतलेले बहुतांशी विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाले आहेतया अधिविभागामध्ये सध्या उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे-

. क्र.

अभ्यासक्रम

सुरुवात वर्ष

उपलब्ध जागा

पात्रता

एम. एस्सी. (संख्याशास्त्र)

१९८२

३०

बी. एस्सी. (संख्याशास्त्र)

एम. एस्सी. (उपयोजित संख्याशास्त्र माहितीशास्त्र – Applied Statistics and Informatics)

२०१३

२५

बी. एस्सी. (संख्याशास्त्र)

एम. फिल. (संख्याशास्त्र)

१९८४

मार्गदर्शक प्राध्यापकांच्या उपलब्धतेनुसार

एम. एस्सी. (संख्याशास्त्र)

पीएच. डी. (संख्याशास्त्र

१९८४

 हे सर्व अभ्यासक्रम अद्ययावत जागतिक दर्जाचे आहेत. एम. एस्सी. (उपयोजित संख्याशास्त्र माहितीशास्त्र) हा अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान (UGC) आयोगाच्या Innovative Programme (Teaching and Research in Interdisciplinary and Emerging Areas) या योजनेअंतर्गत सुरु करण्यात आला असून तो खास करून खाजगी क्षेत्रामध्ये करि करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे. तथापि, हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी शैक्षणिक सरकारी क्षेत्रांमधील पदांसाठीही पात्र आहेत. या विषयांचे अभ्यासक्रम साधारणपणे दर तीन वर्षांनी अद्ययावत केले जातात. तसे करीत असताना माजी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रा कार्यरत असणाऱ्या नामवंतांचा अभिप्राय घेतला जातो. तसेच गरजेनुसार विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार नवीन विषय समाविष्ट केले जातात. वेळोवेळी माजी विद्यार्थ्यांना निमंत्रित करून आजी विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे रोजगाराच्या संधी कोठे शा आहेत, त्याचबरोबर शैक्षणिक अहर्तेबरोबर अधिकचे कोणते ज्ञान (उदा. संगणकाचे ज्ञान, संख्याशास्त्राची सॉफ्टवेअर्स, नवीन विषय .) असणे गरजेचे आहे, याची अद्ययावत माहिती मिळते. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना चांगला लाभ होतो. अधिविभागा नेट-सेट परीक्षा, स्पर्धा परीक्षा यांविषयी मार्गदर्शनासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. अधिविभागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धा . उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अशा प्रकारच्या स्पर्धां विद्यार्थ्यानी पारितोषिकेही मिळवली आहेत. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, म्हणून अधिविभागामध्ये प्लेसमेंट कक्षाची स्थापना केली आहे. कक्षामार्फत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रोजगार संधींबाबत मार्गदर्शन केले जाते; तसेच, विविध कंपन्यांशी संपर्क साधून मुलाखतींचे आयोजन केले जाते.     अधिविभागामध्ये सध्या एकूण सात तज्ज्ञ अनुभवी शिक्षक कार्यरत आहेत. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे-

. क्र.

नाव

शैक्षणिक पात्रता

पद

अनुभव (वर्षांमध्ये)

प्रा. श्रीमती. एच. व्ही कुलकर्णी

एम.एस्सी,एम.फिल.,पीएच.डी.,नेट

प्राध्यापक अधिविभागप्रमुख

३३

प्रा. डी. टी. शिर्के

एम.एस्सी, पीएच.डी., नेट

प्राध्यापक

३३

प्रा. डी. एन. काशीद

एम.एस्सी, एम. फिल., पीएच.डी., 

प्राध्यापक

३४

प्रा. एस. बी. महाडिक

एम.एस्सी,एम.फिल.,पीएच.डी.,सेट  

प्राध्यापक

२२

डॉ. डी. एम. सकटे (लीनवर)

एम.एस्सी, पीएच.डी., नेट      

सहाय्यक प्राध्यापक

१३

श्री. एस. डी. पवार

एम.एस्सी, सेट, नेट 

सहाय्यक प्राध्यापक

०८

श्री. एस. व्ही. राजगुरू

एम.एस्सी, सेट, नेट

सहाय्यक प्राध्यापक

०७

 

अधिविभागातील शिक्षक पारंपरि अध्यापन पद्धतीबरोबर आधुनिक आय.सी.टी. अध्यापन प्रणालीचा वापर करीत आहेत. अधिविभागातील शिक्षक हे ज्ञानदानासोबत संशोधन कार्यातही अग्रेसर आहेत. अधिविभागातील शिक्षकांचे संशोधन संख्याशास्त्र विषयाच्या नामांकित आंतराष्ट्रीय राष्ट्रीय शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याचबरोबर अधिविभागातील शिक्षक इतर विषयातील संशोधकांना तसेच सरकारी खाजगी आस्थापनांना कन्सल्टन्सी सेवा देतात. यासाठी अधिविभागाने "Statistical Consultancy Unit"ची स्थापना केली आहे. अधिविभागाने केलेल्या ज्ञानदान, संशोधन कन्सल्टन्सी कार्यावर आधारित यु.जी.सी., डी.एस.टी., रुसा, सी.एस.आय.आर., एन.बी.एच.एम. . शिखर संस्थांकडून संशोधनासाठी पायाभूत सुविधांसाठी भरघो निधी प्राप्त झाला आहे. विद्यापीठ निधी इतर शिखर संस्थांकडून प्राप्त झालेल्या निधीतून अधिविभागामध्ये उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सुविधांचा तपशील पुढीलप्रमाणे-

 

. क्र.

तपशील

व्याख्यान कक्ष 

०४

प्रयोगशाळा

०२

संशोधन प्रयोगशाळा

०१

स्पेशलायझेशन प्रयोगशाळा

०५

डेस्कटॉप संगणक

११२

प्रिंटर

डॉट मॅट्रिक्स: , ऑल वन: , मल्टीफंक्शनल प्रिंटर:

एलसीडी प्रोजेक्टर

०४

इंटरनेट सुविधा

१४२ नोड्स, वायफाय झोन

यूपीएस

केव्हीए - ०२, . केव्हीए०१, २० केव्हीए - ०१

१०

सांख्यिकीय सॉफ्टवेअर

कमर्शियल: SAS, MINITAB, MATLAB, SPSS, SYSTAT, STATISTICA. फ्रीवेअर: R, Python, LaTeX.

११

अधिविभागीय ग्रंथालय

बुक्स: ६४५जर्नलचे इश्यू: ५९१, प्रबंध: १११

 

एम. एस्सी.मध्ये शिकत असणाऱ्या बहुतांशी विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शाहू शिष्यवृत्ती, एकलव्य शिष्यवृत्ती, शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती, संख्याशास्त्र अधिविभाग रौप्य महोत्सवी शिष्यवृत्ती, DST INSPIRE, Cytel Fly High Sponsorship (Under CSR activity of Cytel Statistical Software & Services Private Limited) यापैकी कोणतीही एक शिष्यवृत्ती मिळते. तसेच एम.फिल. पीएच.डी. करीत असलेल्या विद्यार्थ्यांना DST INSPIRE, RGNF, शिवाजी विद्यापीठ सुवर्ण महोस्तवी फेलोशिप, Resaerch Assistant under DST PURSE, UGC SAP scheme किंवा विविध संशोधन प्रकल्पाअंतर्गत JRF/SRF च्या माध्यमातून  र्थिक साहाय्य मिळते. 

संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधारकांना विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या रोजगाराच्या संधी ढोबळ मानाने शैक्षणिक संशोधन क्षेत्र, शासकीय क्षेत्र, खाजगी क्षेत्र स्वयं रोजगार या चार क्षेत्रामध्ये विभागता येतील.

v  शैक्षणिक संशोधन क्षेत्र: एम. एस्सी. पदवीनंतर सेट/नेट उत्तीर्ण झालेले उमेदवार वरिष्ठ महाविद्यालयामध्ये तसेच विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र होतात. याशिवाय पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना वैद्यकीय, कृषी तसेच व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक किंवा सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी संधी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये अभिरुची असेल त्यांना एम. फिल. किंवा पीएच. डी. या संशोधन पदवीसाठी प्रवेश घेता येतो. संशोधक विद्यार्थ्यांना  यूजीसी, सीएसआयआर, डीएसटी यासारख्या विविध शिखर संस्थांकडून आकर्षक संशोधन शिष्यवृत्ती मिळण्याची सुविधा आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी या शिखर संस्थांकडून त्यांना विशेष संशोधन शिष्यवृत्ती दिल्या जातात. पीएच. डी. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना देशविदेशात विविध शैक्षणिक संशोधन संस्थांमध्ये अध्यापनाच्या संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत.

 v  शासकीय क्षेत्र: संख्याशास्त्रातील विद्यार्ध्यांना शासकीय क्षेत्रामध्ये विशेष संधी उपलब्ध आहेतबी. एस्सी. (संख्याशास्त्र) पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना युपीएस्सी मार्फत घेण्यात येणाऱ्या इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस (आयएसएस) ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएसएस (वर्ग-) अधिकारी होता येते. हे अधिकारी देशपातळीवरील विविध विषयासंबधीच्या सर्वेक्षणाचा आराखडा तयार करण्यापासून ते देशाच्या वेगवेगळ्या बाबीमधील द्य परिस्थिती दर्शविणारे निर्देशांक काढणे यासंबंधीचे काम पाहतात. त्यांनी दिलेल्या माहितीचा राष्ट्रीय पातळीवरील योजना धोरणे निश्चित करण्यासाठी उपयोग केला जातो. रिजर्व बँक ऑफ इंडियामध्ये  एम. एस्सी. पदवीधारकांना संशोधक अधिकारी (वर्ग-) या पदासाठी संधी आहे. राज्य पातळीवर  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जिल्हा सांख्यिकी अधिकारी (डीएसओ) संशोधन अधिकारी (आरओया राजपत्रित वर्ग- पदांसाठी निवड केली जाते. या पदांसाठी केवळ  एम. एस्सी. (संख्याशास्त्र) पदवीधारकच पात्र आहेत. जिल्हा सांख्यिकी अधिकारी बढतीनंतर जिल्हा नियोजन अधिकारी होऊ शकतात. शासनाच्या सर्व योजनांच्या जिल्हा पातळीवरील अंमलबजावणीच्या नियोजनाची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. याशिवाय एम. एस्सी. पदवीधारकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये विभागीय सांख्यिकी अधिकारी म्हणून संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस, भारतीय हवामानशास्त्र विभाग, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा परिषदा, सार्वजनिक विदयापीठे आशा अनेक आस्थापनांमध्ये सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी सहाय्यक, इत्यादी पदे खास संख्याशास्त्राच्या पदवीधारकांकरितापलब्ध आहेत. तसेच राष्ट्रीयकृत बँकामध्ये सहाय्यक व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक/ व्यवस्थापक (सांख्यिकीशास्त्रज्ञ/जोखीम) यासारख्या  पदांसाठी संख्याशास्त्राच्या पदवीधारकांची आवश्यकता असते.     

 v  खाजगी क्षेत्र: औषधनिर्माण क्षेत्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या क्लिनिकल ट्रायल्सचा आराखडा तयार करण्यापासून ते निरीक्षणांचे विश्लेषण करून संबंधित औषध सुरक्षित प्रभावी आहे का, यासंबंधी निष्कर्ष काढण्यासाठी संख्याशात्रीय पद्धतीचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे औषधनिर्माण क्षेत्रामध्ये संख्याशास्त्रज्ञांना विशेष संधी आहेत. तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे गेल्या दोन दशकांपासून प्रचंड प्रमाणात माहितीची निर्मिती होत आहेत. या माहितीचे व्यवस्थापन करणे तिचे विश्लेषण करणे आव्हानात्मक बनले आहे. यातूनच जगभरामध्ये अनेक विश्लेषक (Analytics) कंपन्यांचा उदय झाला आहे. या कंपन्या इतर उद्योग अथवा संस्थांच्या माहितीचे विश्लेषण करून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी मदत करतात. अशा कंपन्यांमध्ये संख्याशास्त्रातील विद्यार्थ्यांना डेटा सायंटिस्ट, बिझनेस अनॅलिस्ट, स्टॅटिस्टिकल प्रोग्रॅमर, व्यवस्थापक इत्यादी पदांसाठी आकर्षक वेतनासह मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याशिवाय खाजगी बँका, उत्पादन उद्योग, पर्यटन उद्योग, कृषी उद्योग, विविध सेवा उद्योग, तसेच व्यापार, आरोग्य, विमा, इत्यादी क्षेत्रांमध्ये धोरण तयार करणे, कल जाणून घेणे, गुणवत्ता नियंत्रण आणि सुधारणा, प्रक्रिया देखरेख, इत्यादींसाठी योग्य माहिती गोळा करणे तिचे विश्लेषण करणे आवश्यक असते. या कामासाठी या क्षेत्रांमध्ये संख्याशास्त्रज्ञांना विपुल प्रमाणात मागणी आहे. आजमितीस असे क्वचितच एखादे खाजगी क्षेत्र असेल, ज्या ठिकाणी संख्याशास्त्राचा उपयोग केला जात नाही.

 v  स्वयंरोजगार: वर नमूद केल्याप्रमाणे वेळोवेळी तयार होणाऱ्या माहितीचे व्यवस्थापन करणे तिचे विश्लेषण करणे अनेक क्षेत्रांमधील तज्ज्ञांसाठी संशोधकांसाठी आव्हानात्मक बनले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रज्ञ सांख्यिकीय सल्लागार म्हणून काम करू शकतात. या कामाची व्याप्ती स्थानिक ते जागतिक पातळीपर्यंत आहे. freelancer.in, upwork.com, toptal.com यासारख्या संकेतस्थळांच्या हाय्याने संख्याशास्त्रज्ञ घरबसल्या जगातील कोणालाही आपलया वेळेनुसार सांख्यिकीय सेवा देऊन भरघोस उत्पन्न मिळवू शकतात. तसेच जगातील बहुतांशी अभ्रासक्रमांमध्ये संख्याशात्र विषयाचा समावेश असल्यामुळे cheggindia.com, brainfuse.com यासारख्या संकेतस्थळांच्या साह्याने संख्याशास्त्रज्ञ e-tutor म्हणूनही काम करू शकतात.

वर नमूद केलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यरत आहेत, ही बाब विशेषत्वाने नमूद करावी लागेल.

अधिविभागाचा अद्ययावत विस्तृत प्रोफाइल खालील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर खालील लिंक वर उपलब्ध आहे. http://www.unishivaji.ac.in/dptstat/Latest-Department-Profile

 

संपर्कासाठी पत्ता:

मा. अधिविभागप्रमुख,

संख्याशास्त्र अधिविभाग,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, ४१६००४

इमेल: statistics@unishivaji.ac.in

             दूरध्वनी क्र. ०२३१-२६०९२४३

No comments:

Post a Comment