शिवाजी विद्यापीठातील क्रांतीवनातील हुतात्मा स्मारकास अभिवादन करताना (डावीकडून) डॉ. आर.व्ही. गुरव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. एस.बी. महाडिक आदी. |
कोल्हापूर, दि. ९ ऑगस्ट: ऑगस्ट
क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणाहुती देणाऱ्या
क्रांतीवीरांना आज शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रांतीवन येथील हुतात्मा स्मारकास आज सकाळी
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आत्मबलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांप्रती आदरांजली व
कृतज्ञ भावना व्यक्त करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव यांनी यावेळी कवीवर्य
कुसुमाग्रज यांच्या ‘अनाम वीरा...’ या कवितेचे भावपूर्ण वाचन केले. या प्रसंगी
विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. एस.बी. महाडिक, जनसंपर्क
अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment