Thursday, 13 August 2020

शिवाजी विद्यापीठातील शिक्षण संधी-७: युसिक व युसिक (सी.एफ.सी.) विभाग

एमएस्सीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सीबीसीएस’ अभ्यासक्रम

 

शिवाजी विद्यापीठाच्या युसिक विभागात करण्यात येणारी विविध देखभाल दुरुस्तीची कामे.



शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसीमध्ये उपलब्ध असणारी अद्यावत वैज्ञानिक उपकरणे

विद्यापीठ वैज्ञानिक उपकरण विभाग (युसिक) याची स्थापना शिवाजी विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीनुसार सन १९७९ साली करण्यात आली. विद्यापीठाच्या विभागांमध्ये असलेल्या वैज्ञानिक उपकरणांची दुरुस्ती, देखभाल व नवीन उपकरणे तयार करणे, तसेच संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व खर्चिक उपकरणांसाठी एकछत्री केंद्र उभे करणे या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार या विभागाची स्थापना करण्यात आली.

वैज्ञानिक उपकरण देखभालीअंतर्गत सुरुवातीला फक्त चार विभागांपासून सुरु झालेला या विभागाचा व्याप आता आठ विभागांपर्यंत वाढला. सध्या इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटर दुरुस्ती, इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, कारपेंटर, A.C व फ्रिज दुरुस्ती इ. कामे विभागामार्फत करण्यात येतात. या विभागामार्फत विद्यापीठाच्या विविध विभागांतील वैज्ञानिक उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, प्रिंटर याची दुरुस्ती करणे, देखभाल करणे, आवश्यकतेनुसार नवीन उपकरणे तयार करून देणे इत्यादी प्रकारचे काम चालते. विभागामार्फत विद्यापीठातील विविध विभागांतील एकूण २४८ प्रिंटर, १०५ एसी व फ्रिज यांची वार्षिक देखभाल कराराअंतर्गत देखभाल व दुरुस्ती केली जाते.

विद्यापीठातील संशोधन विकासासाठी संयुक्त सुविधा केंद्राची (CFC) स्थापना युसिक विभागाअंतर्गत सन १९८४ साली करण्यात आली. त्या अंतर्गत विभागामध्ये असलेल्या सुविधांमध्ये सातत्याने वाढ करत आज विभागामध्ये FTIR, GCMS, GCMS-MS, TGA, DTA-DSC, पार्टिकल साईझ अॅनालायझर इत्यादी उपकरणे आहेत. व गेल्या वर्षामध्ये विविध फंडींग एजन्सीजकडून (DST-SAIF, DST-PURSE, RUSA) प्राप्त निधीमधून नवीन XRD, XPS, TEM, BIO-AFM, MICRORAMAN, ULTRA-CENTRIFUDGE ही उपकरणे खरेदी केली आहेत.

 

सीबीसीएसअंतर्गत दोन अभ्यासक्रम:

विभागामार्फत १) Thin film Technology, २) Modern Analytical Technique हे दोन अभ्यासक्रम Choice Based Credit System (CBCS) अंतर्गत विज्ञान शाखेतील एमएस्सीच्या विद्यार्थ्यासाठी सुरु करण्यात आले आहेत. त्या बरोबरच विद्यापीठातील व विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या विभागातील सुविधा व उपलब्ध आलेल्या उपकरणांची माहिती होण्यासाठी दरवर्षी माहितीसत्रे आयोजित केली जातात. दरवर्षी दोनशे ते तीनशे विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेतात.

विद्यापीठात उपलब्ध असणाऱ्या वैज्ञानिक उपकरण सुविधांमध्ये सातत्याने भर घालत राहून विज्ञान संशोधनामध्ये विद्यापीठाचा नावलौकिक वाढविण्यासाठी हा विभाग मोलाचे योगदान देत आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क:-

१) प्रा. (डॉ) के. वाय. राजपुरे

प्रभारी विभागप्रमुख

युसिक व युसिक (सी.एफ.सी.)

दुरध्वनी क्र:- ०२३१-२६०९२४५

 

२)  डॉ. जे.बी. यादव

वैज्ञानिक अधिकारी.

युसिक व युसिक (सी.एफ.सी.)

दुरध्वनी क्र:- ०२३१-२६०९३१८

No comments:

Post a Comment