शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाची इमारत |
शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाची स्थापना १९८७ साली झाली. इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग हा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत कार्यरत आहे. भारतातील काही
प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स
विभागामध्ये हा अधिविभाग गणला जातो. सध्या अधिविभागामध्ये
दोन प्राध्यापक व पाच सहायक प्राध्यापक कार्यरत आहेत. अधिविभागामध्ये एम.एस्सी.,
एम.फिल. व पी.एच.डी या अभ्यासक्रमामध्ये पदवी प्राप्त करता येते.
अनु.क्र. |
अभ्यासक्रम |
विद्यार्थी संख्या |
कालावधी |
१. |
एम.एस्सी. |
४० |
२ वर्षे |
२. |
एम.फिल. |
उपलब्धतेनुसार |
२ वर्षे |
३. |
पी.एच.डी. |
उपलब्धतेनुसार |
६ वर्षे |
शासनाकडून इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागास अनेक
अनुदाने प्राप्त झाली आहेत. यामध्ये अधिविभागाला डी.एस.टी.-पर्स,
यु.जी.सी.-एस.ए.पी. आणि रुसा कार्यक्रमांतर्गत संशोधन आणि पायाभूत सुविधा
विकासासाठी अनुदान प्राप्त झाले आहे. विभागाच्या संशोधनासाठी सध्याच्या लक्ष
केंद्रित केलेल्या क्षेत्रामध्ये व्ही.एल.एस.आई., आई.ओ.टी, कम्युनिकेशन, एम्बेडेड,
पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि सेंसिंग सीस्टम यांचा समावेश आहे. अधिविभागामध्ये रुसा
व उद्योग संस्था यांच्या अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलंस इन व्ही.एल.एस.आई. सिस्टीम डिझाईन
या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. व्ही.एल.एस.आई. सिस्टीम डिझाईनसाठी
लागणारे ५० लाख रुपयांचे अद्यावत इ.डी.ए. टूल्स झायलिंक्स व अल्टेरा या
आंतरराष्ट्रीय उद्योग संस्थांकडून प्राप्त झाले आहे. अधिविभागातील प्राध्यापक त्यांच्या कार्यक्षेत्रात जाणकार व
अनुभवी आहेत. अधिविभागातील प्राध्यापक त्यांचे संशोधन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
पातळीवर वेळोवेळी प्रसिद्ध करीत असतात. अधिविभाग वेळोवेळी विविध परिषद/ कार्यशाळा/
चर्चासत्र/ प्रशिक्षण यांचे आयोजन करत असतो.
विद्यार्थ्यांना व संशोधकांना
प्रभावी शिक्षणाचे वातावरण प्रदान करण्यासाठी अधिविभाग स्मार्ट क्लासरूम, एल.सी.डी.
प्रोजेक्शन, डिजीटल बोर्ड, मूडल, संगणक प्रयोगशाळा, इंटरनेट-वाय.फाय., अत्याधुनिक
उपकरणे, स्वतंत्र विभागीय ग्रंथालय इत्यादींनी सज्ज आहे. इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग
विद्यार्थांना उच्चविद्या विभूषित होण्यासाठी व त्यांची कारकीर्द उज्वल होण्यासाठी
प्रोत्साहित करत असतो. विद्यापीठातील विद्यार्थांसाठी वेळोवेळी जॉब फेयरचे आयोजन
अधिविभागामार्फत करण्यात येते.
अधिविभागातील विद्यार्थी मोठ्या संखेने सेट/
नेट/ गेट या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये यशस्वी होत आहेत. तसेच महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. अधिविभागातून
पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग
व शिक्षण संस्थामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment