शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलताना अरविंद देशपांडे |
कोल्हापूर,
दि. २१ ऑक्टोबर: आजचे युग हे ज्ञानयुग आहे. या युगावर ग्रंथांचे अधिराज्य
आहे, असे प्रतिपादन सांगली येथील श्रीमती पुतळाबेन शहा शिक्षणशास्त्र महविद्यालयाच्या
विस्तार सेवा केंद्राचे माजी समन्वयक अरविंद देशपांडे यांनी सोमवारी (दि. १८) येथे
केले.
शिवाजी विद्यापीठाच्या बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि
ग्रंथालय व माहिती शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ऑनलाईन
वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ‘वाचनसंस्कृती व नवोपक्रम’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
श्री.
देशपांडे यांनी व्याख्यानात त्यांनी वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी राबविलेल्या
विविध नवोपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये ‘वाचक परिवार’, ‘माझ्यावर प्रभाव
टाकणारी पुस्तके या विषयावरील निबंध स्पर्धा’, ‘ प्रकट वाचन स्पर्धा’ ,‘पुस्तकांचा
परिणाम व कार्यशाळा, ‘स्वरसाधना लेख’ ,‘माझी सासू, माझी सून संवाद कार्यक्रम’ , पुस्तकांवर
जाहीर वाचन, कविता-साहित्य वाचन कार्यक्रम, पर्यावरण जागृती, विज्ञान कथा लेखन
कार्यशाळा, नवलेखन स्पर्धा, ‘माझे बाबा’ या विषयावर लेखन
स्पर्धा, सर्वानी वाचावीत अशा निवडक पुस्तकांची नावे, त्यातील मजकूर इत्यादी अनुभवपर
मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, वाचन प्रक्रियेतून चांगला लेखक घडणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र, चांगला माणूस घडणे ही या प्रक्रियेची अंतिम साध्यता आहे. वाचन, चिंतन, वक्तृत्व आणि लेखन असे त्याचे टप्पे आहेत. चांगले वाचणाऱ्यांनी नवे वाचक निर्माण करण्यासाठी संबंधित पुस्तकांची माहिती प्रसृत करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर चर्चासत्र, प्रकट वाचन, लेखकांची मुलाखत आदी उपक्रमांचे आयोजन ग्रंथपालांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. केंद्राच्या संचालक डॉ.
नमिता खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार यांनी
परिचय करून दिला. डॉ. युवराज जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सचिनकुमार पाटील
यांनी आभार मानले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपग्रंथपाल डॉ.
पी.बी. बिलावर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात यांच्यासह राज्यभरातील विविध
महाविद्यालयांचे ग्रंथपाल, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment