कोल्हापूर, दि. ६ ऑक्टोबर: युरोपियन युनियन इरॅस्मस
प्लस प्रकल्पाच्या अनुषंगाने संबंधित प्रकल्प व्यवस्थापकांनी शिवाजी विद्यापीठास
भेट देऊन पाहणी केली.
युरोपियन युनियनच्या इरॅस्मस प्लसने
अर्थसाहाय्य केलेल्या, “मिटिगेट द इम्पॅक्ट ऑफ फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ऑन इंडियन
सोसायटी: एज्युकेशन रिफॉर्म फॉर फ्युचर अँड इन सर्व्हिस स्कूल टीचर्स” या प्रकल्पामध्ये शिवाजी विद्यापीठाचा
शिक्षणशास्त्र विभाग काम करीत आहे. या अंतर्गत विभागाला एक कोटी सव्वीस लाख इतके
अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. प्रकल्पाचे पुढील नियोजन व कार्यवाही करण्यासाठी तसेच
या प्रकल्पाविषयक अधिक माहिती देण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती अल्डा टॉलुमी
आणि श्रीमती सिलिया ग्वाटेमेलो यांनी दिनांक ४ व ५ ऑक्टोबर २०२१ अशी दोनदिवसीय भेट
दिली. शिक्षणशास्त्र विभागातील अध्यापक, संशोधकांशी त्यांनी या अनुषंगाने सविस्तर
चर्चा केली.
या भेटीदरम्यान सदर व्यवस्थापकांनी
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचीही सदिच्छा भेट घेतली.
त्यावेळी या प्रकल्पासाठी शिक्षणशास्त्र अधिविभागाला पूर्ण सहकार्य करण्यात येईल,
अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी
स्वागत व परिचय करून दिला. बैठकीस कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व
लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. व्ही.एस. खंडागळे, उपकुलसचिव श्रीमती अडसूळे, सरस्वती
कांबळे, सोनाली कोळी आदी उपस्थित होते. इनोव्हेशन मॅनेजर गीतांजली जोशी यांनी
आभार मानले.
No comments:
Post a Comment