Friday, 29 October 2021

तंत्रज्ञान अधिविभागातील १२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ लाखांचे पॅकेज

 

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील कॅम्पस ड्राइव्हअंतर्गत विविध कंपन्यांत निवड झालेले विद्यार्थी विभागातील मार्गदर्शक व कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत.

तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित कॅम्पस ड्राइव्हप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संचालक डॉ. आर.के. कामत.

कॅम्पस ड्राइव्हअंतर्गत अंतिम वर्षातच रोजगार संधी उपलब्ध

कोल्हापूर, दि. २९ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाद्वारे आयोजित कॅम्पस ड्राइव्हमध्ये संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखांच्या अंतिम वर्षातील बारा विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. त्यांना प्रत्येकी वार्षिक ३ लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे.

अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवाजी विदयापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागा नुकतेच कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आले. आयटी सॉफ्टवेअर  डेव्हलपमेंट क्षेत्रातील नामवंत एक्स्ट्राप्रिन्युअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि थिंकलाऊड सोल्युशन  प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या कॅम्पस ड्राईव्हसाठी आल्या होत्या. कंपनीचे संचालक अविनाश भोकरे सहकारी यांनी विद्यर्थ्यांना कंपनीविषयी माहिती, मुलाखतीची प्रक्रिया पॅकेज त्यादींबाबत मार्गदर्शन केले. ड्राईव्हमध्ये तंत्रज्ञान अधिविभाग आणि डॉ. डी. वाय पाटील इंजीनिअरींग टेकनॉलॉजी महाविद्यालयातून १११ विद्यार्थी सहभागी झाले. अॅप्टीट्यू टेस्ट वैयक्ति मुलाखतीमधून अंतिम १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना प्रतिवर्ष लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रश्मी वादगवे, सृष्टी करोषी, अंकिता मटे, शिविका झा, बाळकृष्ण लिमये, विजय पाटील, श्रेयस देसाई, अर्पिता  घोरपडे, अबोली जाधव, यश कोशामकर, राकेश सुतार आणि सीम शेख यांचा समावेश आहे.

या प्रसंगी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. आर. के. कामत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. एस.बी. सादळे यांनी कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन केले. यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांचे मार्गदर्शन आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील कुलसचिव डॉ. व्ही.डी.नांदवडेकर यांचे प्रोत्साहन लाभले.

No comments:

Post a Comment