Saturday, 9 October 2021

दूरशिक्षण केंद्रामार्फत यंदापासून

चार नवे ऑनलाईन अभ्यासक्रम

 



कोल्हापूर, दि. ९ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रामार्फत या वर्षापासून चार अभ्यासक्रम ऑनलाईन स्वरुपात सुरू करण्याच्या प्रस्तावास मंजुरी प्राप्त झाली असल्याची माहिती केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. सरवदे यांनी दिली आहे. एमबीए, एम.कॉम., एम.एस्सी. (गणित) आणि एम.एस्सी. (संगणकशास्त्र) असे हे चार अभ्यासक्रम आहेत.

डॉ. सरवदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठास नॅक (बंगळूर) यांचे ++’ मानांकन प्राप्त झाल्यानंतर नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्याकडून विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमातून नलाईन अभ्यासक्रम सुरु करण्या मान्यता मिळालेली आहेयामध्ये नियमित एमबीएच्या बरोबरच ऑनलाईन एमबीए, एम.कॉम., एम.एस्सी. (गणित) आणि एम.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यामुळे केवळ राज्यातील किंवा देशातीलच नव्हे, तर विदेशातील विद्यार्थ्यांनाही शिवाजी विद्यापीठात ऑनलाईन शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. हे अभ्यासक्रम सध्याच्या बदलत्या काळानुसार  विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यास उपयुक्त असल्याने त्यांना विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसाद लाभेल, अशी खात्री असल्याचेही डॉ. सरवदे यांनी सांगितले.

हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, यांच्यासह विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे मोठे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment