Saturday, 19 March 2022

‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’च्या ताज्या क्रमवारीत

शिवाजी विद्यापीठाच्या ४८ संशोधकांचे स्थान कायम

 

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील 


विद्यापीठास एच इंडेक्समध्ये देशात ६३वे स्थान; प्र-कुलगुरू पाटील यांचा एच-इंडेक्स ७६

 

कोल्हापूर, दि. १९ मार्च: .डी. सायंटिफिक इंडेक्सतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२२मध्ये शिवाजी विद्यापीठातील एकूण ४८ संशोधक-प्राध्यापकांचा समावेश झालेला आहे. गुगल स्कॉलर सायटेशन्सच्या आधारे काढण्यात आलेल्या या निर्देशांक यादीमध्ये मागील वर्षी असलेल्या संशोधकांनी त्यांचे स्थान कायम राखले आहे. नॅक अ++ मानांकित शिवाजी विद्यापीठासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. शिवाजी विद्यापीठास देशातील २१४५ संस्थांमध्ये एच इंडेक्सच्या आधारावर देशात ६३ वे स्थान प्राप्त झाले आहे. या यादीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचा एच-इंडेक्स हा सर्वाधिक म्हणजे ७६ इतका आहे. भारतातील मोजक्याच संशोधकांचा इतका मोठा एच इंडेक्स आहे.

एडी सायंटिफिक इंडेक्स (अल्पर-डोजर सायंटिफिक इंडेक्स), जर्नल्स आणि विद्यापीठांचे मूल्यमापन करणार्‍या इतर प्रणालींपेक्षा वेगळी आहे. यात शास्त्रज्ञांच्या संशोधनातील कामगिरी आणि वैयक्तिक वैज्ञानिक उत्पादकतेच्या अतिरिक्त मूल्यावर आधारित क्रमवारी आणि विश्लेषण करण्यात आले आहे. शिवाय शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक वैशिष्ट्यांवर आधारित संस्थांची क्रमवारी काढली जाते. एच-इंडेक्सच्या आधारे शिवाजी विद्यापीठाने भारतातील २१४५ संस्थांमध्ये ६३ वे स्थान मिळवले आहे. शिवाजी विद्यापीठ मटेरियल सायन्स संशोधनात सर्वोत्तम संस्थांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तथापि, सदरची क्रमवारी सर्व विज्ञान विषयांतील संशोधनावर आधारित आहे.

या संशोधकांत स्थान प्राप्त करणारे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के हे संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक असून प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांना भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान प्राप्त झाले आहे. सदर यादीत जगातल्या २१६ देशांतील १४,९८१ विद्यापीठांतील ८,२५,७१० संशोधकांच्या डेटाचे पृथक्करण केले आहे. या क्रमवारीत रसायनशास्त्राचे १३, पदार्थविज्ञान ११, जैवरसायनशास्त्र ६, इलेक्ट्रॉनिक्स ४, पर्यावरणशास्त्र ३, फूड सायन्स २, फार्मसी २, वनस्पतीशास्त्र २,  प्राणीशास्त्र २, नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान १, गणित १ असे एकूण ४८ आजी-माजी संशोधक समाविष्ट आहेत. या यादीत ९ निवृत्त प्राध्यापकांचाही समावेश आहे. संलग्नित महाविद्यालयांतील सात संशोधकांचाही या यादीत समावेश आहे.

एच-इंडेक्स म्हणजे काय?

एच-इंडेक्स हा संशोधन लेखक-स्तरीय निर्देशांक आहे, जो प्रकाशनांची उपयुक्तता, उपयोजन आणि उद्धरण प्रभाव या बाबींचे मापन करतो. वैयक्तिक शास्त्रज्ञ आणि विद्वानांच्या संशोधन लेखनासाठी तो वापरला जातो. संशोधनासाठीची पारितोषिक जिंकणे, संशोधन फेलोशिपसाठी स्वीकारले जाणे आणि  विद्यापीठांमध्ये उच्च पदे धारण करणे यासारख्या स्पष्ट यश दर्शविणाऱ्या बाबींशी एच-इंडेक्स निगडित असतो. हा निर्देशांक शास्त्रज्ञांच्या सर्वाधिक उद्धृत केलेल्या कागदपत्रांच्या संचावर आणि त्यांना इतर प्रकाशनांमध्ये मिळालेल्या उद्धरणांच्या संख्येवर आधारित आहे. हा निर्देशांक नुकताच महत्त्वाची जर्नल, विभाग, विद्यापीठे अगर देश यासारख्या शास्त्रज्ञांच्या गटाच्या उत्पादकता आणि प्रभावावरही लागू केला गेला आहे. सन २००५ मध्ये यूसी सॅन दिएगो येथील भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ई. हिर्श यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञांची सापेक्ष गुणवत्ता निश्चित करण्यासाठी एक साधन म्हणून निर्देशांक सुचवला होता. तोच हिर्श इंडेक्स किंवा एच-इंडेक्स म्हणून ओळखला जातो.

ए.डी. सायंटिफिक इंडेक्स २०२२ च्या यादीत स्थान लाभलेले शिवाजी विद्यापीठातील संशोधक पुढीलप्रमाणे असून त्यांचा एच-निर्देशांक कंसात दिलेला आहे.-

भौतिकशास्त्र-

१. डॉ. पी.एस. पाटील (७६)

२. डॉ. के.वाय. राजपुरे (५७)

३. डॉ. सी.एच. भोसले (५४)

४. डॉ. ए.व्ही. मोहोळकर (५२)

५. डॉ. एन.एल. तरवा (२८)

६. डॉ. आर.जी. सोनकवडे (२६)

७. डॉ. व्ही.आर. पुरी (२५)

८. डॉ. एस.बी. साळे (१९) 

९. डॉ. एम.व्ही. टाकळे (१८)

१०. डॉ. टी.जे. शिंदे, इस्लामपूर (१८)

११. डॉ. ए.बी. गडकरी, गोखले महाविद्यालय, कोल्हापूर (१६)

रसायनशास्त्र-

१.  डॉ. के.एम. गरडकर (४०)

२. डॉ. एस.एस. कोळेकर (३४)

३. डॉ. ए.व्ही. घुले (३१)

४. डॉ. एस.डी. डेळेकर (३१)

५. डॉ. जी.बी. कोळेकर (२७)

६. डॉ. डी.एम. पोरे (२४)

७. डॉ. आर.एस. साळुंखे (२२)

८. डॉ. एम.बी. देशमुख (२०)

९. डॉ. जी. एस. राशीनकर (१९)

१०. डॉ. डी.एच. दगडे (१८)

११. डॉ. ए. दोड्डमणी, शाहू महाविद्यालय, कोल्हापूर (११)

१२. डॉ. एस.एम. पाटील, गारगोटी (१०)

१३. डॉ. एन.आर. प्रसाद, जयसिंगपूर (१०)

जैवरसायनशास्त्र-

१. डॉ. एस.पी. गोविंदवार (६७)

२. डॉ. जे.पी. जाधव (४५)

३. डॉ. के.डी. सोनावणे (१९)

४. डॉ. पी. बी. दंडगे (१३)

५. डॉ. पी.के. पवार (१३)

६. डॉ. नीरज राणे, पुणे (१२)

इलेक्ट्रॉनिक्स -

१. डॉ. एस.आर. सावंत (२७)

२. डॉ. टी.डी. डोंगळे (२५)

३. डॉ. पी.एन. वासंबेकर (२३)

४. डॉ. आर.आर. मुधोळकर (१३)

वनस्पतीशास्त्र-

१. डॉ. एन.बी. गायकवाड (१५)

२. डॉ. डी.के. गायकवाड (१३)

प्राणीशास्त्र-

१. (स्व.) डॉ. एम.व्ही. शांताकुमार (१६)

२. डॉ. टी.व्ही. साठे (११)

पर्यावरणशास्त्र-

१. डॉ. पी.डी. राऊत (१६)

२. डॉ. व्ही. कोरे (१०)

३. डॉ. एस. चोंदे (१०)

अन्नविज्ञान व अभियांत्रिकी-

१. डॉ. ए.के. साहू (१५)

२. डॉ. आर. रणवीर (१४)

फार्मसी-

१. डॉ. जे. डिसुझा, वारणानगर (१९)

२. डॉ. एस. पायघन (१७)

संख्याशास्त्र-

१. डॉ. डी.टी. शिर्के (१६)

गणितशास्त्र-

१. डॉ. के.डी. कुचे (१४)

नॅनोसायन्स व तंत्रज्ञान-

१.      डॉ. किरण कुमार शर्मा (१४)

 

No comments:

Post a Comment