कोल्हापूर, दि. २५ मार्च: बहुविद्याशाखीय
संशोधनास चालना देणे ही आजघडीची सर्वात मोठी गरज आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी काल येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात आयोजित चार
दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. ‘मॉलेक्युलर टेक्निक्स इन बायोलॉजीकल रिसर्च’ या विषयावर आहे.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, आंतरविद्याशाखीय
ज्ञानार्जनाचे महत्त्व आज नव्याने अधोरेखित झाले आहे. त्याच्या बरोबरीनेच आता विविध
विद्याशाखांतील संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे. यात
केवळ विज्ञान विद्याशाखाच नव्हे, तर तिच्या जोडीने सामाजिक शास्त्रज्ञांचाही सहभाग
असणे आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीने बहुविद्याशाखीय संशोधनाला प्रोत्साहन
देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे संबंधित संशोधकांनी आता
नवकल्पनांच्या मदतीने देशातील आर्थिक व्यवस्था कशी विकसित करता येईल, या
अनुषंगानेही संशोधनाची दिशा केंद्रित करणे अभिप्रेत आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अधिविभागप्रमुख डॉ. ए. ए. देशमुख यांनी कार्यशाळेचा आराखडा
आणि महत्व सांगितले. कार्यशाळेत पीसीआर, इलेक्ट्रोफोरसीस, प्रोटीन प्युरीफिकेशन, लिपोफिलायझेशन, इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री, फ्लुरोसेन्स मायक्रोस्कोपी इत्यादींचे प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण दिले जाणार
असल्याची माहिती समन्वयक डॉ. एम. व्ही. वाळवेकर यांनी दिली. कार्यशाळेसाठी पुणे, सांगली, सातारा, औरंगाबाद आदी विविध महाविद्यालयांतून
३५ संशोधक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
No comments:
Post a Comment