Saturday, 12 March 2022

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात

 



कोल्हापूर, दि. १२ मार्च: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.

यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के   प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी. आर. पळसे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. प्रकाश पवार, डॉ. भारती पाटील,  डॉ. आर. व्ही. गुरव, गजानन साळुंखे, डॉ. उमेश गडेकर, डॉ.  नितीन माळी, चेतन गळगे, डॉ. कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार, सुधीर देसाई, डॉ. वैशाली भोसले, अमोल मिणचेकर, डॉ. विशाल ओव्हाळ,  डॉ. सागर वाळवेकर, डॉ. दादा ननावरे, पशुराम वडार, डॉ. नीलम खामकर, मृणालिनी जगताप, उर्मिला दशवंत आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment