प्राणीशास्त्र अधिविभागातील चार दिवसीय कार्यशाळेचा समारोप
कोल्हापूर, दि. ३१ मार्च: विद्यापीठातील संशोधकांनी अधिकाधिक समाजोपयोगी संशोधनाकडे
लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डी. टी. शिर्के यांनी नुकतेच येथे केले.
विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागाने युजीसी स्ट्राईड कार्यक्रमांतर्गत २३ ते २६ मार्च २०२२ या कालावधीत ‘मॉलिक्युलर टेक्निक्स इन बायोलॉजिकल रिसर्च’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली. या
कार्यशाळेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले,
शिवाजी विद्यापीठाचे मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात मोठे नाव आहे. विज्ञान, सामाजिक
विज्ञान अशा सर्वच विद्याशाखांत संशोधनाचे कार्य गतीने आणि चांगले सुरू आहे. तरीही
आता सामाजिक उपयोजनाच्या दृष्टीकोनाची संशोधनकार्याशी सांगड घालण्याची आवश्यकता
निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने विद्यापीठीय संशोधकांनी आपल्या संशोधनाची
केंद्रित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनीही आजीवन विद्यार्थी असण्याच्या भूमिकेतून
विद्याभ्यास करीत राहिल्यास त्याचे उत्तम फलित मिळाल्याखेरीज राहणार नाही.
यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान
विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत यांनी प्राणिशास्त्र विषयातील संशोधकांनी इतर विषयांशी सांगड घातली, तर संशोधनाच्या आणखी किती तरी दिशा लाभतील, असे सांगितले.
कार्यशाळेत सीएसआयआर-एनसीएल, पुणे येथील गोपाळ कल्लुरे यांनी ‘पीसीआर व अॅग्रोस जेल इलेक्ट्रोफोरेसीस’ या विषयावर व्याख्यान व प्रात्याक्षिक दिले. तेथीलच शारदा मोहिते यांनी ‘एसडीएस-पेज’ या विषयावरील
प्रात्यक्षिक दाखविले. संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर
येथील स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसचे डॉ. अभिनंदन
पाटील यांनी ‘प्रॉब सोनिकेटर व ल्योफिलायझर’विषयी व्याख्यान दिले. त्या संदर्भातील प्रात्यक्षिकेही दाखवली. विभागप्रमुख डॉ. ए.ए. देशमुख यांनी ‘आयडेन्टीफिकेशन ऑफ प्रोटीन लोकॅलायझेशन बाय इम्युनोसायटोकेमिस्ट्री’ या विषयावर
व्याख्यान व हॅन्ड्स ऑन प्रशिक्षण दिले. बेंगलोर
येथील लॉरेन्स अॅन्ड मेयो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ
संशोधक पद्मनाभन रवी
यांनी ‘प्रिन्सिपल ऑफ लाइट अॅन्ड डार्क फिल्ड मायक्रोस्कोपी’ या विषयावर व्याख्यान
दिले व प्रात्यक्षिक सादर केले. कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठासह डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि डॉ. डी.वाय. पाटील
विद्यापीठ, कोल्हापूर येथील ३५ संशोधकांनी
सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे आयोजन प्राणिशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. ए.ए. देशमुख व डॉ. एम. व्ही. वाळवेकर यांनी केले.
No comments:
Post a Comment