Thursday 5 May 2022

विद्यार्थ्यांनी शाहूविचारांचे दूत बनावे: प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील

 

चंदगड येथील व्याख्यानात बोलताना शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. मंचावर अॅड. एस.आर. पाटील व प्राचार्य डॉ. पी.आर. पाटील.


चंदगड येथील व्याख्यानात बोलताना शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. मंचावर अॅड. एस.आर. पाटील व प्राचार्य डॉ. पी.आर. पाटील.

चंदगड येथील व्याख्यानात बोलताना शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. समोर उपस्थित शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी.


 

कोल्हापूर, दि. मे: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी शाहूविचार आत्मसात करून त्यांचे विचारदूत बनले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील यांनी आज चंदगड येथे केले. 

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त कोल्हापूर जिल्हयात आज सकाळी ११ वाजता 'जागर शाहू कर्तृत्वाचा' या विषयाच्या अनुषंगाने एकाच वेळी शंभर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचे राजर्षी शाहू महाराज यांचा पर्यावरणविषयक दृष्टीकोन' या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. एस.आर. पाटील अध्यक्षस्थानी होते.

प्र-कुलगुरू डॉ.पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सुरूवातीपासूनच सत्तेचा उपयोग दीन-दलि रयतेच्या समस्या सोडविण्यासाठी केला. समाजातील जातीभेद नष्ट करण्याकामी पुढाकार घेतला. शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे कायदे तयार करून त्यांची अंमलबजावणी केली.  रयतेसाठी विविध कल्याणकारी योजना, उपक्रम राबवून शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य समर्थपणे पुढे चालू ठेवले. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या अस्पृश्य आणि बहुजन समाजाच्या हितासाठी वज्रमूठ बांधून सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा वटहुकूम अंमलात आणला.  शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. यासाठी करवीरनगरी अनेक वसतिगृहे बांधली, शाळा सुरू केल्या. सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी शाहू महाराजांनी फार मोलाचे योगदान दिले. सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून एखाद्या समस्येचे निराकरण करण्याची शाहू महाराजांची हातोटी वाखाण्याजोगी होती. दूरदृष्टी लाभलेल्या राजाने त्यावेळी समाजाची जडणघडण अतिशय शिस्तबद्ध रितीने करण्याचा प्रयत्न केला. त्या ते यशस्वी झाले. भटक्या विमुक्त जातीजमातींच्या लोकांचे पुनर्वसन करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. संगीत, नाट, कला, मल्लविद्या आदींना राजाश्रय दे त्यांचा यथोचित सन्मान केला. कोल्हापूरच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन शंभर वर्षांपूर्वी राधानगरी धरणाची निर्मिती भोगावती नदीवर केली. ते आजही भक्कमपणे उभे आहे.  जलव्यवस्था नितीचा उत्तम नमुना म्हणून आजही त्याकडे आपणास पाहता येईल. 

शाहू महाराजांनी निसर्गाचा होणारा ऱ्हास ओळखून घरटी झाडे लावून त्यांची देखभाल निगराणी करण्याचे जनतेला र्मा काढले. घनदाट जंगले सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षा अधिकारी यांची नेमणू केली. झाडांबरोबरच पशुपक्ष्यांच्या संवर्धनासाठीही महाराजांनी विशेष प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्राचार्य डॉ. पी.आर. पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. डॉ. ए.डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपप्राचार्य डॉ. एस.के. सावंत यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment