Monday 9 May 2022

कर्मवीर भाऊराव पाटील यांना

शिवाजी विद्यापीठात अभिवादन

 




कोल्हापूर, दि. ९ मे: शिवाजी विद्यापीठात आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठातील मानव्यविद्या इमारतीसमोरील कर्मवीर पाटील यांच्या पुतळ्यास कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्य प्रशासकीय भवनातही कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या हस्ते कर्मवीर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. संभाजी शिंदे, डॉ. सचिन पन्हाळकर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment