Tuesday 10 May 2022

विद्यार्थ्यांतूनच सक्षम नेतृत्व घडेल : अमित कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठाचे पाचगणीत नेतृत्व विकास शिबिर

 

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने पाचगणी येथील बहाई अकॅडमीमध्ये आयोजित केलेल्या तीन दिवसीय नेतृत्व विकास शिबिराचे उद्घाटन करताना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी. सोबत डावीकडून राजन सावंतविद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरवबहाई अकॅडमीचे संचालक लेसन आझादीनेतृत्व विकास केंद्राचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव आदी.

कोल्हापूर, दि. १० मे: सर्वसमावेशक नेतृत्वावर समाजाची प्रगती अवलंबून असते. या दृष्टीकोनातून सरकारने विद्यार्थी निवडणुका निर्भय आणि निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी एक चांगला कायदा तयार केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास येत्या काळात विद्यार्थ्यांमधून सक्षम नेतृत्व पुढे येईलअसा विश्वास शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास कक्षनेतृत्व विकास केंद्र आणि बहाई अकॅडमी यांच्यावतीने पाचगणी येथे आयोजित तीन दिवसीय नेतृत्व विकास शिबिराचे उद्घाटक या नात्याने ते बोलत होते.

या शिबिरात सांगलीसाताराकोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.  आर.व्ही. गुरवनेतृत्व विकास केंद्राचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधवबहाई अकॅडमीचे संचालक लेसन आजादीउपसंचालक राजन सावंत उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणालेतत्कालीन राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या निवडणूक संदर्भात केलेला कायदा खूप महत्त्वाचा आहे. या कायद्यातून पक्षविरहित निवडणुका होण्यास मदत होईल. निवडणुकांतील गैरप्रकार रोखणे यामुळे शक्य होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये खरोखरच नेतृत्वगुण आहेतअशा विद्यार्थ्यांना निवडणुकीत चांगली संधी असेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न नेमकेपणाने मांडणे यामुळे शक्य होईल. कोणत्याही गैरप्रकारापासून मुक्त तसेच निर्भय वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडण्यासाठी कायद्यात अनेक तरतुदी आहेत. सध्याच्या काळामध्ये समाजाला चांगल्या नेतृत्वाची गरज असून ही गरज विद्यार्थ्यांमधून येत्या काळात पूर्णत्वास येईलअसा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. गुरव म्हणालेशिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवतो. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. विद्यार्थीच्या कल्याणाच्या आणि हिताच्या दृष्टीने विद्यापीठाने अनेक योजना हाती घेतल्या आहेत. या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकसित होण्यासाठी आयोजित केलेले हे शिबिर याच उपक्रमाचा एक भाग आहे.

लेसन आझादी म्हणाले,  नेतृत्व विकास शिबिरातून मिळणाऱ्या ज्ञानातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात निश्चितपणे सकारात्मक बदल होईल.

 या शिबिरामध्ये डॉ. गुरव यांनी विद्यार्थी विकास विभागाच्या विविध योजना,  सातारा जिल्ह्याचे  पोलीस अधीक्षक अभय कुमार बन्सल यांनी प्रशासनातील नेतृत्वबहाई अकॅडमीचे संचालक लेसन आझादी यांनी सार्वत्रिक मानवी मूल्येनेतृत्व विकास केंद्राचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी माध्यमे आणि व्यक्तिमत्व विकासनवनाथ बोंबले यांनी हॅपी हीपो शो,  डॉ. संजय ठिगळे यांनी राष्ट्र उभारणी तरुणांचे योगदान,  प्रा. कबीर खराडे यांनी सायबर सिक्युरिटी, पुणे येथील प्रशांत साठे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक कायदा २०१६ आणि विध्यार्थीडॉ. ए. पी. कुलकर्णी यांनी विद्यापीठ कायद्यातील विविध टप्पेरुसाचे वरिष्ठ सल्लागार प्रमोद पाबरेकर यांनी उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थी नेतृत्वाचे योगदानशहाजी लॉ कॉलेजचे डॉ. प्रवीण पाटील यांनी भारतीय राज्यघटना आणि मूलभूत हक्कआयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाली यांनी नेतृत्वासाठी जीवनशैली आयुर्वेद आणि आहारडॉ. जी. एस. राशिनकर यांनी संवाद कौशल्ये तर मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक निलेश सावे यांनी भारताची सांस्कृतिक परंपरा या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्राचीप्रियांकानितीन आणि गणेश आदी युवा महोत्सवात सहभागी होऊन विद्यापीठाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले.

शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. पी. जी. कुंभार यांच्या हस्ते या शिबिराचा समारोप झाला. डॉ. कुंभार यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 

बहाई अकॅडमीचे पराग तांदळे यांनी स्वागत केले. नेतृत्व विकास केंद्राचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment