कोल्हापूर, दि. २०
मे: पद्मश्री डॉ. ग.गो.
जाधव यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी डॉ. बाळकृष्ण यांच्या साथीने अखंड
पाठपुरावा केला आणि अंतिमतः विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर या विद्यापीठाने आपला
लौकिक सर्वदूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांची ती इच्छा आज फलद्रूप
झाली आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.) डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या
वतीने आज डॉ. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले
होते. त्यावेळी ते बोलत होते.
तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते
डॉ. ग.गो. जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी
अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर
यांच्यासह प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment