|
शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह अन्य अधिकारी. |
|
शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह अन्य अधिकारी. |
|
शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन झाल्यानंतर उपस्थितांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह अन्य अधिकारी. |
|
शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त झांजवादनाची प्रात्यक्षिके सादर करताना महिला कर्मचारी. |
|
शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त झांजवादनाची प्रात्यक्षिके सादर करताना महिला कर्मचारी. |
कोल्हापूर, दि. १ मे: महाराष्ट्र राज्याचा ६२वा स्थापन
दिन आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
सकाळी ठीक आठ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या
विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर केले. कुलगुरू डॉ. शिर्के व
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी उपस्थित विभागप्रमुख,
शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिक यांना महाराष्ट्र
दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य
अश्वारुढ पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. ध्वजवंदनानंतर शिवाजी विद्यापीठातील
महिला कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर झांजवादनाची प्रभावी प्रात्यक्षिके
सादर केली. आपले कौटुंबिक व दैनंदिन कार्यालयीन कामकाज सांभाळून महिला
कर्मचाऱ्यांनी झांजवादनासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल कुलगुरू डॉ. शिर्के यांनी
सर्व महिला कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक व अभिनंदन केले. या कलेमध्ये त्यांनी सातत्य
राखावे, असे आवाहनही केले.
या वेळी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक
जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे
अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.
एस.एस. महाजन, कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, अंतर्गत
गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे
संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक
डॉ. नमिता खोत यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व
कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment