Thursday, 5 May 2022

शिवाजी विद्यापीठात डॉ. आप्पासाहेब पवार यांची जयंती उत्साहात

 



कोल्हापूर, दि. ५ मे: शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांची ११६वी जयंती आज विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आज सकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये डॉ. पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. किसनराव कुराडे, डॉ आप्पासाहेब पवार प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. एस्. जे. नाईक, उपाध्यक्ष डॉ. सी.टी. पवार, सचिव प्रा. टी.के. सरगर, प्राचार्य डॉ. अशोकराव जगताप, प्राचार्य डॉ. जी.पी. माळी, विद्यार्थी भवनचे अधक्षक डॉ. निलेश तरवाळ, डॉ.भादोले यांच्यासह विद्यार्थी भवनचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या अतिथीगृहासमोरील डॉ. आप्पासाहेब पवार यांचा पुतळा आणि डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका विद्यार्थी वसतीगृह येथीलही पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

No comments:

Post a Comment