Friday 6 May 2022

शिवाजी विद्यापीठात सामूहिक स्तब्धता पाळून

लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन

Photo: Suvij Movies, Kolhapur

Photo: Suvij Movies, Kolhapur

Photo: Suvij Movies, Kolhapur



 



शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह समस्त शिवाजी विद्यापीठ परिवार लोकराजा शाहू महाराज यांना १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती जमला.


कोल्हापूर, दि. ६ मे: राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी दिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठ परिवाराने सामूहिकरित्या स्तब्धता पाळून या लोकराजाला अभिवादन केले.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वांतर्गत आज शाहू महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त सकाळी ठीक १० वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. या आवाहनास शिवाजी विद्यापीठ परिवाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज अभिवादन कार्यक्रमासाठी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह सर्व अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती उभे राहिले. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस ठीक ९.४५ वाजता पुष्पहार अर्पण करून कुलगुरू व प्र-कुलगुरू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दाखल झाले. ठीक १० वाजता सर्व विद्यापीठ परिवार या लोकराजाला अभिवादन करण्यासाठी स्तब्ध झाला. सर्वांनी मौनातून शाहूरायांना मनोमन श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. नमिता खोत, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, दूरशिक्षण केंद्र संचालक डॉ. डी.के. मोरे, शाहू स्मृती शताब्दी सप्ताह समिती अध्यक्ष डॉ. भारती पाटील, राष्ट्रीय येवा योजना समन्वयक अभय जायभाये यांच्यासह माजी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभेचे सन्माननीय सदस्य यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शाहू महाराजांना वाहिली पुष्पांजली



सदर कार्यक्रमापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

या वेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, शाहू संशोधन केंद्राच्या डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. नीलांबरी जगताप, राष्ट्रीय येवा योजना समन्वयक अभय जायभाये आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment