शिवाजी विद्यापीठात अॅग्रोकेमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंटच्या नूतन इमारतीचे
उद्घाटन
कोल्हापूर, दि. ६ मे:
शिवाजी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रात स्वतःचा लौकिक सर्वदूर केला आहे. अॅग्रोकेमिकल्स अँड
पेस्ट मॅनेजमेंट (एजीपीएम) हा अभ्यासक्रमही त्याला अपवाद नसून आता स्वतंत्र इमारतीमुळे
व सुविधा विकासामुळे या विभागातील अध्यापनाबरोबरच संशोधनाला गती येईल, असा विश्वास
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या अॅग्रोकेमिकल्स अँड पेस्ट
मॅनेजमेंट विभागाच्या नूतन इमारतीचे आज मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री श्री. सामंत आज विद्यापीठात विविध कामकाजाचा
आढावा घेण्यासाठी आले होते. या आढावा बैठकीनंतर श्री. सामंत यांच्या हस्ते अॅग्रोकेमिकल्स
अँड पेस्ट मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले. कोनशिला अनावरण
आणि फीत कापून उद्घाटन समारंभ झाला. त्यानंतर मंत्री श्री. सामंत यांनी फिरून विभागाची
पाहणी केली. प्रयोगशाळेतील उपकरणांची व विभागात सुरू असलेल्या संशोधनाची माहिती
त्यांना विभागप्रमुख डॉ. एस.एस. चव्हाण यांनी दिली. डॉ. चव्हाण यांनी मंत्री श्री.
सामंत यांना विभागाच्या वाटचालीचा अहवाल सादर केला. तो पाहून मंत्री श्री. सामंत
यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, अभियांत्रिकी विभागाचे प्रभारी उपकुलसचिव
आर.पी. यादव, डॉ. नागराजा, डॉ. के.डी. सोनावणे, डॉ. ए.डी. जाधव, डॉ. चैताली बगाडे,
डॉ. किशोर खोत यांच्यासह विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment