सोलापूर विद्यापीठाविरुद्धच्या सामन्यात एक चेंडू फटकविताना शिवाजी विद्यापीठाचे अनिल पाटील |
शिवाजी विद्यापीठाचे विक्रम कोंढावळे |
पुणे विद्यापीठ व लोणेरे विद्यापीठ यांच्यातील सामन्यामधील एक क्षण |
आजच्या सकाळच्या सत्रात शिवाजी
विद्यापीठ संघाचा सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या संघाशी
सामना झाला. हा सामना शिवाजी विद्यापीठाने आठ गडी राखून जिंकला.
सोलापूर संघाने
नाणेफेक जिंकून
प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी 20 षटकात
8
बाद 105 धावा
केल्या. यामध्ये सोलापूर
विद्यापीठाकडून प्रशांत
पुजारी यांनी नाबाद
56,
महादेव वलेकर यांनी
13 आणि
श्रीशैल देशमुख यांनी
12
धावा केल्या.
शिवाजी विद्यापीठाच्या
अजय आयरेकर यांनी ४ षटकांत २७ धावांच्या मोबदल्यात तीन बळी घेतले. त्यानंतर शिवाजी
विद्यापीठाने फलंदाजी
करताना 11.2 षटकात
2
बाद 110 धावा करून सामना जिंकला. अनिल पाटील यांनी नाबाद
45 तर
विक्रम कोंडावळे यांनी
33
धावा केल्या.
सोलापूरच्या राजकुमार आणि मुख्तार शेख यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. शिवाजी
विद्यापीठाचे अजय आयरेकर सामनावीर ठरले.
सकाळचा दुसरा सामना सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठ आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र
विद्यापीठ, लोणेरे यांच्यात झाला. हा
सामना पुण्याने ८१ धावांनी जिंकला.
लोणेरे संघाने
नाणेफेक जिंकून
प्रथम गोलंदाजी घेतली.
प्रथम फलंदाजी
करताना पुण्याने 20 षटकात
8
बाद 189 धावा
केल्या. पुण्याच्या
मनिष गायकवाडनी
80
धावा केल्या.
लोणेरे विद्यापीठाच्या
जितू अंधेरे
यांनी 4 गडी
बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना लोणेरे संघ 20 षटकात
9
बाद 108 धावा करू शकला. त्यांच्या रोहीत
गमरे यांनी 29 तर निलेश
भोईर यांनी 28 धावा
केल्या. पुण्याच्या
सुनिल माने
व बसवंत
गजलवार यांनी प्रत्येकी
2
गडी बाद
केले. मनिष
गायकवाड यांना सामनावीर घोषित
करण्यात आले.
दुपारच्या सत्रात
नागपूरचे महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ आणि
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यात सामना झाला. नागपूरने
हा सामना आठ गडी राखून जिंकला. नाशिकने नाणेफेक जिंकून
प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी 20 षटकात 5 बाद 123 धावा केल्या. या
संघाकडून राजेंद्र शहाणे यांनी नाबाद 48, योगेश राऊत यांनी 29 व नंदकिशोर
ठाकरे यांनी 17 धावा केल्या. नागपूर संघाकडून अजित माळी,
विठ्ठल धायगुडे, काकासाहेब खोसे आणि अजय
गावंडे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. प्रत्युत्तरादाखल
नाशिक संघाने 15.2 षटकात 2 बाद
126 धावा केल्या. अजय गावंडे यांनी 38, अतुल ढोक यांनी 31 व सतीश यादव यांनी 24 धावा केल्या. नाशिकच्या मुकुंद मुळे व नंदकुमार
वाघ यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. नाबाद ३८ धावांसह एक बळीही
मिळविणाऱ्या नागपूरच्या अजय गावंडेना सामनावीर घोषित करण्यात आले.
दिवसातला अखेरचा
सामना शिवाजी विद्यापीठाचा ब संघ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
यांच्यात झाला. हा सामना शिवाजी विद्यापीठ ब संघाने ८१ धावांनी
जिंकला.
शिवाजी विद्यापीठ
ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि 20 षटकात 7 बाद 230 धावांचा डोंगर
रचला. यात दिपक कांबळे यांच्या 38, संतोष शिंदेच्या 33, अभिजीत कोठावळेंच्या 53 आणि शशिकांत दाभाडे यांच्या 25 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल
खेळताना नाशिक संघ 20 षटकात 6 बाद 149 धावाच करू शकला. त्यांच्याकडून संदीप भागवत
यांनी नाबाद 54 धावांची खेळी केली. शिवाजी विद्यापीठाच्या
ब संघाकडून राजू मुपडे, अनिल साळोखे, शशिकांत दाभाडे, संतोष खाडे, संतोष
शिंदे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. सामन्यात 33 धावा व एक बळी घेणारा संतोष
शिंदे सामनावीर ठरला.
No comments:
Post a Comment