कोल्हापूर, दि.23 मार्च: शिवाजी विद्यापीठात आज शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनीही शहीदांच्या प्रतिमांना पुष्प वाहून आदरांजली व्यक्त केली. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा
योजना विभागाचे संचालक डॉ.तानाजी चौगुले, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ.शिवलिंगप्पा सपली, डॉ.महेश
साळुंखे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment