Tuesday 28 March 2023

पहिल्या 'शिवस्पंदन'मध्ये संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग सर्वसाधारण विजेता

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'शिवस्पंदन २०२२-२३'मध्ये सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करणाऱ्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या चमूस सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक प्रदान करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रकाश गायकवाड आदी.



कोल्हापूर, दि. २८ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिवस्पंदन २०२२-२३ या विद्यापीठस्तरीय कला, सांस्कृतिक स्पर्धेमध्ये संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाने सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक पटकावला.

शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील विद्यार्थ्याच्या सांस्कृतिक कलागुणांना संधी मिळण्यासाठी शैक्षणिक वर्ष सन 2022-23 पासून विद्यापीठ स्तरीय सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमास ''शिवस्पंदन'' हे नाव देण्यात आले आहे. या स्पर्धा गट स्तरीय व विद्यापीठ स्तरीय अशा दोन स्तरामध्ये घेण्यात आल्या. गट स्तरीय स्पर्धा  दि. 19 ते 25 मार्च या कालावधीत पार पडल्या असून या स्पर्धां 7 गटांमध्ये विभागण्यात आली. समूहनृत्य, लघुनाटिका, मूकनाटय, भारतीय समूहगीत, लोकवाद्य, नकला, सुगम गायन, एकल नृत्य या आठ कला प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. 

या स्पर्धामधून प्रथम व द्वितीय क्रमांक काढून विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी पात्र स्पर्धकांच्या स्पर्धा दि.27 मार्च रोजी राजमाता जिजाऊसाहेब बहुद्देशिय सभागृह व वि. स. खांडेकर भाषा भवन या ठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये कला प्रकारनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले. सर्वांत जास्त गुण मिळविणाऱ्या संगीत व नाटयशास्त्र अधिविभागास सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक  देण्यात आला.

'शिवस्पंदन' कार्यक्रमासाठी कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के,  प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, शिवस्पंदन 2022-23 कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.नितिन कांबळे यांनी कार्यक्रम सुरळीतपणे पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.  रसायनशास्त्र अधिविभागाचे डॉ. के. एम. गरडकर, भूगोल अधिविभागाच्या डॉ. श्रीमती. एम. बी. पोतदार, नॅनो सायन्स अधिविभागाचे डॉ. प्रमोद कसबे, शिक्षणशास्त्र अधिविभागाचे डॉ. व्ही. एस. खंडागळे, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे डॉ. के. व्ही. मारुलकर, समाजशास्त्र अधिविभागाचे डॉ. पी. एम. माने, तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ. पी. डी. पाटील त्याचबरोबर विद्यार्थी विकास विभागातील सहाययक अधिक्षक श्रीमती. एस. टी. आडके व वरिष्ठ सहाय्यक सुरेश मोरे यांचे सहकार्य लाभले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-

अ. क्र

कला प्रकार

क्रमांक

अधिविभागाचे नाव/विद्यार्थ्यांचे नाव

1

सुगम गायन

प्रथम

कु. प्रतिक्षा पोवार

संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग

द्वितीय

कु. हर्षदा परीट

संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग

तृतीय

कु. धनश्री माने

यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ रुरल डेव्हलपमेंट

2

समुहगीत

प्रथम

संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग

द्वितीय

वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग

तृतीय

पर्यावरणशास्त्र अधिविभाग

3

नकला

प्रथम

पर्यावरणशास्त्र अधिविभाग

द्वितीय

डिपार्टमेंट ऑफ नॅनो सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी

तृतीय

इतिहास अधिविभाग

4

मुकनाटय

प्रथम

पर्यावरणशास्त्र अधिविभाग

द्वितीय

डिपार्टमेंट ऑफ नॅनो सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी

तृतीय

संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग

5

लघुनाटीका

प्रथम

इतिहास अधिविभाग

द्वितीय

डिपार्टमेंट ऑफ नॅनो सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी

तृतीय

भुगोल अधिविभाग

6

लोकवाद्यवादन (एकल)

प्रथम

संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग

द्वितीय

डिपार्टमेंट ऑफ फुड सायन्स

तृतीय

संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग

7

एकल नृत्य

प्रथम

कु. अंबिका पांढरबळे

पर्यावरणशास्त्र अधिविभाग

द्वितीय

कु. गायत्री गोखले

डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी

तृतीय

कु. अंकिता डांगे

संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग

 

8

समुह नृत्य

प्रथम

संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग

द्वितीय

पर्यावरणशास्त्र अधिविभाग

तृतीय

इतिहास अधिविभाग

 


No comments:

Post a Comment