कोल्हापूर, दि. १२ मार्च: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री व देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात
मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. भारती पाटील, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ. नितीन माळी, डॉ. संतोष सुतार, डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. उमेश गडेकर, डॉ. कविता वड्राळे, डॉ. वैशाली भोसले, डॉ. तानाजी घागरे, चेतन गळगे, गजानन साळुंखे, परशुराम वडार यांच्यासह केंद्राचे अन्य शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment